ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात तीन सामन्यांची वनडे मालिका सुरु झाली आहे. पण ही मालिका सुरु होण्याआधीच भारताचे क्रिकेटपटू हार्दिक पंड्या आणि केएल राहुलला निलंबित करत मायदेशी बोलावले आहे.
खेळाडूला परदेश दौऱ्यातून माघारी बोलावणे हे भारतीय क्रिकेटच्या बाबतीत दुसऱ्यांदा घडले आहे. पहिली घटना तब्बल ८२ वर्षापूर्वी घडली होती.
१९३६ला इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघातील लाला अमरनाथ यांना मायदेशी परत पाठवले होते. त्यांचे कर्णधार विजयानंद राजू उर्फ विझी यांच्यासोबत मतभेद झाल्याने त्यांना भारतात पाठवण्यात आले होते.
त्यावेळीही भारतीय संघात नियमांच्या उल्लंघनावरून वाद होत होते. मात्र पहिल्यांदाच भारतीय क्रिकेट बोर्डने त्यावर कारवाई करण्याचे पाऊल उचलले होते.
हार्दिक आणि राहुल हे दोघे कॉफी विथ करन या शोमध्ये महिलांबद्दल विवादात्मक विधाने केल्यामुळे निंलबित झाले आहेत.
लाला हे संघात राजकारण झाल्याने मायदेशी परतले होते, असे मार्टीन विलियनसन यांनी इएसपीएन क्रिकइन्फोसाठी लिहलेल्या ‘राइट रॉयल इंडियन मेस’ या लेखात म्हटले आहे.
इंग्लंड दौऱ्यात लाला हे पाठीच्या दुखापतीतून सावरले नव्हते. तरीही त्यांना आराम दिला न देता लॉर्ड्स सामन्यासाठी फलंदाजी करण्यासाठी तयार होण्यास सांगितले होते. मात्र विझी यांनी त्यांना थांबवून दुसऱ्या फलंदाजास मैदानावर पाठवले होते.
यामुळे रागाने लाला यांनी ड्रेसिंग रूममध्ये येत त्यांचे कीट फेकून दिले होते आणि पंजाबी भाषेत ‘मला माहित आहे येथे काय चालले आहे’, असे म्हटले होते.
‘त्यावेळी भारतीय संघात विजी आणि मॅनेजर जॅक ब्रिटेन जोन्स यांना पकडून बहुतेक जणांना पंजाबी भाषा कळत नव्हती. म्हणून लाला यांनी बोललेल्या विधांनांची अफवा परसली आणि त्यांना संघ सहकाऱ्यांनी स्वाक्षरी केलेल्या पत्रासह भारतात परत पाठवण्यात आले होते’, असे लाला यांचा मुलगा राजींदर अमरनाथ यांनी लिहलेल्या ‘लाला अमरनाथ: लाईफ अँड टाईम्स’ या पुस्तकात लिहले आहे.
त्याचबरोबर १९९६च्या इंग्लंड दौऱ्यावेळी नवज्योत सिंग सिंद्धू यांनी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांच्याशी झालेल्या वादामुळे कोणालाही न सांगता दौरा अर्धवट सोडून भारतात परतले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
–शतकी खेळी करणाऱ्या रोहित शर्माने विव रिचर्ड्स यांचा विक्रम मोडला
–भारताच्या अंबाती रायडूची गोलंदाजी ऍक्शन अवैध…
–रोहित शर्मा शिकतोय शिखर धवनच्या मुलीकडून डान्स, पहा व्हिडिओ