या महिन्यात भारत ‘अ’ संघ न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यावर भारत ‘अ’ संघ न्यूझीलंड ‘अ’ संघाविरुद्ध 3 वनडे सामने आणि 2 चार दिवसीय कसोटी सामने खेळणार आहे.
निवडकर्त्यांनी रणजी ट्राॅफीतील एकही सामना न खेळलेल्या पंड्याला न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारत ‘अ’ संघात स्थान दिले होते. पण आता तो या दौऱ्यातून बाहेर पडला आहे.
पण पंड्याचे प्रशिक्षक एस रजनीकांत यांनी पंड्याने अजून त्याच्या गोलंदाजीचे प्रशिक्षण घ्यावे आणि त्याच्यावर येणाऱ्या ताणाची तपासणी करावी म्हणून त्याला भारत ‘अ’ संघाबरोबर न्यूझीलंड दौऱ्यावर जाण्यासाठी नकार दिला आहे.
“तो 100% तंदुरुस्त आहे. याबद्दल काहीही शंका नाही. पण मला त्याने सलग आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याचा ताण लगेच घ्यावा असे वाटत नाही. पंड्यासाठी अद्याप कोणतीही फिटनेस टेस्ट घेण्यात आली नाही, त्यामुळे कोणतीही टेस्ट नापास झाल्याचा प्रश्नच नाही,” असे रजनीकांत यांनी टाइम्स ऑफ इंडियाला सांगितले.
“पण तो तंदुरुस्त नसल्यामुळे किंवा कोणत्याही टेस्टमध्ये अपयशी ठरल्यामुळे संघातून बाहेर झालेला नाही. तो तंदुरुस्त आहे, तो आत्ता योयो टेस्टमध्येही 20 गुण मिळवू शकतो. त्याच्या गोलंदाजीमुळेच मी त्याला का बाहेर काढले. ते काम अजूनही प्रगतीपथावर आहे, ” असे रजनीकांत पुढे म्हणाले.
त्यामुळे आता पंड्याऐवजी अष्टपैलू क्रिकेटपटू विजय शंकरला भारत ‘अ’ संघामध्ये स्थान देण्यात आले आहे. तसेच विजय भारत ‘अ’ संघाबरोबर न्यूझीलंड दौऱ्यासाठी गेला आहे.
टी२० क्रमवारीत नवदीप सैनीने घेतली मोठी गरुडझेप!
वाचा- 👉https://t.co/WZKwX4Gos5👈#म #मराठी #Cricket #NavdeepSaini
— Maha Sports (@Maha_Sports) January 11, 2020
अजिंक्य रहाणेच्या त्या प्रश्नावर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने दिले उत्तर
वाचा- 👉 https://t.co/Yy0uKVYZOr👈#म #मराठी #Cricket @ajinkyarahane88 @sachin_rt— Maha Sports (@Maha_Sports) January 11, 2020