रविवारी (७ ऑगस्ट) रात्री राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतीय महिला क्रिकेट संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध नऊ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. ही सलग दुसरी मोठी स्पर्धा आहे ज्यात ऑस्ट्रेलिया संघाने भारताचा अंतिम फेरीत पराभव केला आहे. या पराभवानंतर भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर खूपच निराश झाली असून तिने पराभवाचे खापर संघाच्या फलंदाजीवर फोडले आहे.
भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत सामना संपल्यानंतर म्हणाली की, “प्रत्येक वेळी मोठ्या फायनलमध्ये आपण तीच चूक करतो. आम्ही बॅटने वारंवार चुका करत आहोत आणि त्या सुधारण्याची गरज आहे. लीग टप्प्यात किंवा द्विपक्षीय मालिकेत आम्ही ही चूक करत नाही. कुठेतरी ते आमच्या मनाला अडवत आहे. मी अशी व्यक्ती आहे जी नेहमी माझ्या संघात आणखी एका फलंदाजाच्या शोधात असते. दुर्दैवाने आम्ही अजूनही त्यावर काम करत आहोत. एकदा आपण ते मिळवले की, डावात गडबडणारी गोष्ट संपेल.”
“सुवर्ण जिंकता आले असते, पण जे मिळाले त्यात समाधानी आहोत”
भारतीय संघाला अंतिम फेरीत निराशाजनक पराभवाला सामोरे जावे लागले असले तरी त्यांनी संपूर्ण स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आणि हरमनप्रीतला याचा अभिमान आहे. ती म्हणाली की, “मला माहित आहे की आपण सहज सुवर्ण जिंकू शकलो असतो, परंतु काहीही न मिळण्यापेक्षा काहीतरी मिळवणे चांगले आहे. निदान आम्हाला रौप्य पदक मिळाले आहे. आम्ही केलेल्या सर्व परिश्रमानंतर, आम्ही त्यास पात्र होतो. सुवर्ण नाही मिळाले तर काय, जे मिळाले त्यात समाधानी आहोत.”
दरम्यान, १६२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने १६व्या षटकापर्यंत १२१ धावा केल्या होत्या. हरमनप्रीत कौरने ६५ धावांची शानदार खेळी खेळली, पण ती बाद झाल्यानंतर फलंदाजी कोलमडली आणि भारतीय संघ केवळ १५२ धावाच करू शकला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
चिन्नाथालासाठी आयुष्य खर्ची केरणारा ‘सुपर फॅन’ हरपला! रैनाने व्यक्त केले दुःख
पळताना स्पर्धकाची चड्डी घसरली आणि त्याचे मेडलचे स्वप्न भंगले
पती क्रिकेट तर पत्नी स्क्वॉशमध्ये करतेय भारताचे ‘नाव रोशन!’ वाचा कार्तिकच्या बायकोचा खास कारनामा