इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या किया सुपरलीगमध्ये भारताची हरमनप्रीत कौरने मंगळवारी (14 आॅगस्ट) अर्धशतक केले. तिने ही शानदार कामगिरी करत लँकेशायर थंडर संघाच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला.
हा सामना लँकेशायर थंडर विरुद्ध यॉर्कशायर डायमंड्स यांच्यात झाला. या सामन्यात हरमनप्रीतने 44 चेंडूत 74 धावा केल्या. यात तिने 4 चौकार आणि 6 षटकार मारले. हे तिचे या लीगमधील पहिलेच अर्धशतक आहे.
तिने मारलेला एक चेंडू तर मैदानाबाहेर बसलेले बीबीसीचे पत्रकार स्टुअर्ट फ्लिंडर्स यांच्या अगदी जवळून गेला. त्यामुळे ते सुदैवाने मोठी दुखापत होण्यापासून वाचले. त्याचबरोबर तिच्या एका शॉटने कारची वाइंडस्क्रीनही फोडली.
The dangers of an in-form @ImHarmanpreet 🚀🚀🚀
A lucky escape for @BBCNWT's @FlindersStuart today @BlackpoolCC! 😂
💥 #ThunderisComing #KSL2018 pic.twitter.com/WXaL2z7vWl
— Lancashire Women (@LancsCricketWMN) August 14, 2018
https://twitter.com/AlexHartley93/status/1029454975171284993
चौथ्या क्रमांकावर खेळायला आलेल्या हरमनप्रीतने सुरुवातीला सलामीवीर फलंदाज निकोल बोल्टोनला चांगली साथ देत 53 धावांची भागिदारी रचली होती. मात्र निकोल 46 धावांवर असताना बाद झाल्याने त्यांची भागिदारी तूटली.
हरमनप्रीतला शेवटच्या षटकात कॅथरिन ब्रंटने बाद केले. हरमनप्रीतने केलेल्या अर्धशतकाच्या जोरावर लँकेशायर थंडरने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 154 धावा केल्या.
पण यॉर्कशायर डायमंड्सला लँकेशायरने दिलेले 155 धावांचे लक्ष यशस्वी पार करण्यात अपयश आले. त्यांना लँकेशायर गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी करत 145 धावांवर रोखले. यामुळे लँकेशायरने या सामन्यात 9 धावांनी विजय मिळवला.
यामुळे यॉर्कशायरच्या बाद फेरीच्या आशा संपुष्टात आल्या आहेत.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–जेव्हा आयसीसीच्या क्रमवारीत सर्वच खेळाडू येतात अव्वल स्थानी
–हार्दिक पंड्याच्या नावासमोरुन अष्टपैलू टॅग काढून टाकायला हवा
–म्हणून होत आहे स्टीव्ह स्मिथचे कौतुक