जगातील सर्वात मोठी व्यावसायिक टी20 लीग असलेल्या आयपीएलच्या लिलावाचा पहिल्यांदाच भाग झालेला इंग्लंडचा युवा फलंदाज हॅरी ब्रुक याने पहिल्याच लिलावात नवा विक्रम प्रस्थापित केला. दीड कोटींची आधारभूत किंमत असलेल्या ब्रुकला तब्बल 13.25 कोटी रुपये देत सनरायझर्स हैदराबादने आपल्या ताफ्यात सामील केले. या लिलावानंतर तो चांगला चर्चेत आला होता. मात्र, याच ब्रुक याने पुढील महिन्यात सुरू होत असलेल्या दक्षिण आफ्रिका टी20 लीगमधून माघार घेतली आहे.
ब्रुक याने अगदी काही दिवसांवर आलेल्या या लीगमधून माघार घेण्याचे कारण म्हणजे त्याला इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाकडून न हरकत प्रमाणपत्र मिळालेले नाही. ब्रुक हा इंग्लंडच्या तीनही प्रकारच्या संघांचा सदस्य आहे. त्यामुळे त्याच्यावर खेळाचा अतिरिक्त ताण येऊ नये तसेच तो तंदुरुस्त राहावा म्हणून बोर्डाने हा निर्णय घेतला.
ब्रुक हा दक्षिण आफ्रिका टी20 लीगमध्ये जोहान्सबर्ग सुपर किंग्स संघासाठी खेळणार होता. हा संघ आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्स यांच्या मालकीचा आहे. सुपर किंग्स फ्रॅंचायजीचे मुख्य कार्यकारी अधिकारी काशी विश्वनाथ यांनी देखील याबाबत माहिती देताना म्हटले,
“हॅरी इंग्लंडचा प्रमुख खेळाडू असल्याने त्याला बोर्डाने ना हरकत प्रमाणपत्र दिलेले नाही. आम्हाला त्यांच्या निर्णयाचा आदर आहे. त्याची उणीव संघाला नक्कीच भासेल. त्याच्या जागी बदली खेळाडूची घोषणा आम्ही लवकरच करू.” ब्रुक याला जोबर्ग सुपर किंग्स संघाने जवळपास एक कोटी रुपयांच्या रकमेसह आपल्या संघात सामील केलेले.
ब्रुक याने इंग्लंडसाठी आतापर्यंत केव्हा चार कसोटी व 20 टी20 सामने खेळले आहेत. त्याच्या एकूण टी20 कारकीर्दीचा विचार केल्यास त्याने 99 सामन्यात 148 च्या स्ट्राईक रेटने धावा कुटल्या आहेत. नुकत्याच झालेल्या पाकिस्तान दौऱ्यावरील तीन कसोटी सामन्यात त्याने तीन शतके झळकावलेली.
(Harry Brook Not Play In South Africa T20 League For Joburg Super Kings)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अफगाणिस्तान क्रिकेटमध्ये पुन्हा ‘राशिद राज’! नबीनंतर ‘या’ प्रकारात सांभाळणार नेतृत्वाची जबाबदारी
क्लासिक केन! विलियम्सनच्या नाबाद द्विशतकाने पाकिस्तान बॅकफूटवर; कराची कसोटीला निर्णायक वळण