पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात कसोटी मालिका गुरुवारी (1 डिसेंबर) सुरू झाली. मालिकेतील या पहिल्या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली. ब्रॅंडन मॅक्युलम इंग्लंडचा मुख्य प्रशिक्षक बनल्यापासून संघाचे प्रदर्शन उंचावल्याचे पाहायला मिळाले आहे. मॅक्युलमच्या मार्गदर्शनात इंग्लंड ‘बझबॉल’ रणनीती वापरत असल्याचे अनेकदा आपण ऐकले आहे. गुरुवारी पुन्हा एकदा इंग्लंडचे फलंदाज अशाच पद्धतीने कसोटी सामन्यात आक्रमक फलंदाजी करताना दिसले. त्यांच्या एका फलंदाजाने षटकातील सर्व चेंडू सीमारेषेपार लावण्याची कमाल करून दाखवली आहे.
इंग्लंड संघ पाकिस्तानविरुद्धच्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना टी-20 सामन्याप्रमाणे खेळत होता. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडने 75 षटकांमध्ये 4 विकेट्सच्या नुकसानावर 506 धावा केल्या. या धावा करण्यासाठी इंग्लंडच्या वरच्या फळीतील तिन्ही फलंदाजांनी शतकीय योगदान दिले. जो रुट (Joe Root) मात्र अवघ्या 23 धावांवर बाद झाला. पाचव्या क्रमांकावर फलंदाजाली आलेला हॅरी ब्रुक (Harry Brook) 101, तर सहाव्या क्रमांकावरील कर्णधार बेन स्टोक्स (Ben Stokes) 34 धावा करून खेळपट्टीवर कायम आहेत.
इंग्लंडसाठी सलामीवीर झॅक क्राउले (Zak Crawley) आणि बेन डिकेत (Ben Duckett) यांनी अनुक्रमे 122 आणि 107 धावांची खेळी केली. तिसऱ्या क्रमांकावर आलेला ओली पॉप 108 धावा करून बाद झाला. ब्रुक संघासाठी शतक करणारा चौथा फलंदाज ठरला. ब्रुकने खेलेले शतक इतर तिघांपेक्षा जास्त म्हणजेच 124.69 च्या स्ट्राईक रेटने केले. यादरम्यान त्याने एका षटकातील सर्वच्या सर्व सहा चेंडूंवर चौकार मारले. पहिल्या डावातील या 68 व्या षटकात पाकिस्तानची फिरकी गोलंदाज सौद शकील (Saud Shakeel) गोलंदाजी करत होता.
https://twitter.com/imAmanDubey/status/1598277012418101250?s=20&t=Z1B9wQi1WHREYoFZLYSFjQ
ब्रुक कसोटी क्रिकेटच्या इतिहासात एका षटकात (ज्यामध्ये एकही अतिरिक्त चेंडू टाकला गेला नसेल) सहा चौकार मारणारा पाचवा फलंदाज ठरला आहे. 2007 नंतर कसोटी क्रिकेटमध्ये एका षटकात सहा चौकार मारणारा एकही फलंदाज दिसला नाहीये. न्यूझीलंडच्या क्रेग मॅकमिलन (Craig McMillan) याने 2001 मध्ये पहिल्यांदा अशी कामगिरी केली होती. यावेळी पाकिस्तानचा युनिस खान (Younis Khan) गोलंदाजी करत होता. यादीत दुसऱ्या क्रमांकावर ब्रायन लारा (Brian Lara) आहे, ज्याने 2003 मध्ये केवीन पीटरसनविरुद्ध अशी कामगिरी केली होती.
तिसऱ्या क्रमांकावर ख्रिस गेल (Chris Gayle) आहे, ज्याने 2004 मध्ये मॅथ्यू हेगर्ड (Matthew Hoggard) याच्या चेंडूवर सलग सहा चौकार मारले होते. यादीत चौथ्या क्रमांकावर सनथ जयसूर्या (Sanath Jayasuriya) ज्याने जेम्स अँडरसन (James Anderson) विरुद्ध खेळताना 2007 मध्ये ही कामगिरी केली होती. यादीत पाचव्या क्रमांकावर हॅरी ब्रुक नव्याने सामील झाला आहे. ब्रुकने गुरुवारी पाकिस्तानविरुद्ध खेळातना सौद शकीलची चांगलीच धुलाई केली.
कसोटी सामन्यात एका षटकात सहा चौकार मारणारे षटकार
क्रेग मॅकमिलन विरुद्ध युनिस खान (2001)
ब्रायन लारा विरुद्ध केवीन पीटरसन (2003)
ख्रिस गेल विरुद्ध मॅथ्यू हेगर्ड (2004)
सनथ जयसूर्यका विरुद्ध जेम्स अँडरसन (2007)
हॅरी ब्रुक विरुद्ध सैद शकील (2022)
(Harry Brooke hits six sixes in an over)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बीसीसीआयने केली सल्लागार समितीची निवड, सदस्यांमध्ये ‘या’ माजी खेळाडूंचा समावेश
वेस्ट इंडिजविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा 57 वर्षाचा भन्नाट योगायोग! स्मिथ, लॅब्युशेनने पाडला धावांंचा पाऊस