इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलच्या चौदाव्या हंगामासाठी दिल्ली कॅपिटल्सने बिहारच्या एका खेळाडूचा संघात समावेश केला आहे. या खेळाडूचे नाव आहे हर्ष विक्रम सिंग असे या खेळाडूचे नाव आहे. मूळचा बिहारचा असलेला हर्ष यापूर्वी राजस्थान रॉयल्सच्या संघाचा भाग होता. आता यावेळी त्याच्या रुपात बिहारचा एकमेव खेळाडू आयपीएल मध्ये खेळतांना दिसेल.
अष्टपैलू खेळाडू म्हणून आहे ओळख
हर्षची निवड दिल्लीच्या संघाने एक व्यावसायिक गोलंदाज म्हणून केली आहे. मात्र २५ वर्षीय हर्ष एक अष्टपैलू खेळाडू म्हणून देखील ओळखला जातो. हर्षने दिल्ली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी मधून इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले आहे. लहान वयातच त्याने क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती. आपल्या युनिव्हर्सिटीच्या संघाचा तो कर्णधार देखील होता.
साल २०१८ मध्ये हर्षने बिहार कडून आपला पहिला रणजी ट्रॉफी सामना खेळला. आपल्या पहिल्याच सामन्यात त्याने दमदार कामगिरीने लक्ष वेधून घेतले होते. या सामन्यात बिहारच्या संघाने नागालॅंड विरूद्ध खेळतांना एकवेळ ८० धावांवर ९ विकेट्स गमावल्या होत्या. त्यावेळी हर्षने दहाव्या क्रमांकावर फलंदाजीला येत नाबाद ४८ धावांची खेळी उभारली होती. हा सामना बिहारने जिंकला होता. या खेळाडूने २०१९ साली सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत बडोद्याच्या संघाविरुद्ध देखील एक सामना खेळला होता.
हर्षच्या कुटुंबियांमध्ये आनंदाचे वातावरण
हर्षची दिल्ली कॅपिटल्सच्या संघासाठी निवड झाल्याने त्याच्या कुटुंबियांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. हर्ष विक्रम सिंगचे वडील अमरेंद्र कुमार सिंग एक आयपीएस अधिकारी असून ते दिल्ली पोलिसांच्या अतिरिक्त पोलीस कमिशनर म्हणून कार्यरत आहेत. त्याचे कुटुंबिय बिहारमधील जमुई जिल्ह्यातील मलयपुर गावातील आहेत. या गावातही हर्षच्या निवडीने आनंद पसरला आहे. आता येत्या आयपीएलमध्ये दिल्लीकडून खेळण्याची संधी मिळाल्यास दमदार कामगिरी करण्याचे त्याचे ध्येय असेल.
महत्वाच्या बातम्या:
अशा २ व्यक्ती, ज्यांनी खेळाडू व प्रशिक्षक म्हणून जिंकला आहे क्रिकेट विश्वचषक
धोनीने ज्या बॅटने षटकार मारत विश्वचषक जिंकला तिला मिळाली भलतीच किंमत
कोण घेणार आयपीएलमधून माघार घेतलेल्या हेजलवुडची जागा? सीएसकेच्या अधिकाऱ्याने दिले उत्तर