आयपीएलमध्ये आजच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जनं पंजाब किंग्जविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना 9 विकेट गमावून 167 धावा केल्या. या सामन्यात सीएसकेसाठी रवींद्र जडेजानं सर्वात मोठी खेळी खेळली. तो २६ चेंडूत ४३ धावा करून बाद झाला. या सामन्यात चेन्नईचे दोन फलंदाज पहिल्या चेंडूवर बाद (गोल्डन डक) झाले.
या सामन्यात ‘गोल्डन डक’ होणारा पहिला फलंदाज म्हणजे शिवम दुबे. त्याला राहुल चहरनं आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवलं. जितेश शर्मानं यष्टीमागे त्याचा झेल घेतला. यानंतर महेंद्रसिंह धोनीनं आपली रणनीती बदलली. तो आज 9व्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. मात्र तो आल्यापावली तंबूत परतला. हर्षल पटेलनं धोनीला पहिल्याच चेंडूवर क्लीन बोल्ड केलं.
पंजाबविरुद्धच्या सामन्यात सीएसकेच्या सातत्यानं विकेट्स पडत होत्या. मात्र तरीही धोनी लवकर फलंदाजीला उतरला नाही. 150 धावांवर शार्दुल ठाकूरच्या रुपात चेन्नईची 7वी विकेट पडली. त्यानंतर धोनी फलंदाजीला आला. त्यावेळी 9 चेंडू टाकायचे बाकी होते. आजच्या सामन्यात धोनी काहीतरी खास करेल असं वाटत होतं. परंतु झालं ते त्याच्या उलटच! वेगवान गोलंदाज हर्षल पटेलनं धोनीला पहिल्याच चेंडूवर क्लीन बोल्ड केलं. अशाप्रकारे धोनी ‘गोल्डन डक’वर आऊट झाला.
Deceived 🤯
Reactions says it all as MS Dhoni departs to a brilliant slower one from Harshal Patel 👏
Watch the match LIVE on @JioCinema and @StarSportsIndia 💻📱#TATAIPL | #PBKSvCSK | @PunjabKingsIPL pic.twitter.com/gYE5TqnqaY
— IndianPremierLeague (@IPL) May 5, 2024
आयपीएलच्या इतिहासात धोनी आज पहिल्यांदाच नवव्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. या सामन्यात त्याच्याकडे वरच्या क्रमावर फलंदाजीला येऊन संघाची धावसंख्या मजबूत करण्याची चांगली संधी होती. मात्र त्यानं तसं केलं नाही.
हर्षल पटेलनं आयपीएलमध्ये धोनीला एकूण तिसऱ्यांदा बाद केलं आहे. त्यानं आज धोनीला पहिल्यांदाच ‘गोल्डन डक’वर बाद केलं आहे. त्याच्या आधी आणखी 5 गोलंदाजांनी धोनीला शून्यावर बाद केलं होतं. शेन वॉटसन, डर्क नॅन्स, हरभजन सिंग, आवेश खान आणि मोहित शर्मा हे ते ५ गोलंदाज आहेत.
हर्षत पटेलविरुद्ध महेंद्रसिंह धोनीचा रेकॉर्ड अजिबात चांगला नाही. धोनीनं आयपीएलमध्ये हर्षलच्या 33 चेंडूंचा सामना केला, ज्यावर त्यानं 25 धावा केल्या आहेत. धोनीची हर्षलविरुद्धची सरासरी केवळ 8.33 आहे, तर त्याचा स्ट्राइक रेट 75.75 आहे. हर्षलच्या 33 चेंडूंवर त्यानं 2 चौकार मारले असून, धोनीला अद्याप एकही षटकार मारता आलेला नाही. या दरम्यान धोनीनं 16 डॉट बॉलही खेळले आहेत.
आयपीएलमध्ये महेंद्रसिंह धोनीला पहिल्या चेंडूवर बाद करणारे गोलंदाज
2010 – शेन वॉटसन
2015 – हरभजन सिंग
2023 – मोहित शर्मा
2024 – हर्षल पटेल
महत्त्वाच्या बातम्या –
सीएसकेच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी, ‘बेबी मलिंगा’ जखमी होऊन आयपीएलमधून बाहेर
ऋतुराज गायकवाडचं नशीबच फुटकं! ११ पैकी १० सामन्यांमध्ये हरला टॉस; लवकरच करणार लाजिरवाणा विक्रम