---Advertisement---

पदार्पण करण्यापूर्वी द्रविडने काय दिला होता सल्ला? हर्षल पटेलने केला खुलासा

On: शनिवार, नोव्हेंबर 20, 2021 4:56 PM
---Advertisement---

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात सध्या सुरू असलेल्या टी२० मालिकेतील दुसरा सामना शुक्रवारी (१८ नोव्हेंबर) पार पडला. या सामन्यात भारताने न्यूझीलंडला ७ विकेट्सने पराभूत केले. या सामन्यात हर्षल पटेलला भारतीय संघात संधी दिली गेली होती. त्याने देखील या संधीचा पुरेपूर उपयोग करून घेतला. हर्षलसाठी हा त्याच्या कारकिर्दीतील पहिला टी२० आंतरराष्ट्रीय सामना ठरला. त्याच्या पहिल्या टी२० सामन्यात त्याला सामनावीर पुरस्काराने सन्मानित केले गेले.

हर्षलला त्याचा पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळण्यासाठी मोठा काळ वाट पाहावी लागली आहे. त्याने आंतराष्ट्रीय सामना खेळण्यापूर्वी देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएलमध्ये आपली छाप उमटवली आहे. हर्षलने पदार्पणाच्या आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात चार षटकात २५ धावा दिल्या आणि दोन महत्वाच्या विकेट्स घेतल्या. यामध्ये त्याने पहिली विकेट १२ व्या षटकात डॅरील मिशेलची (३१) घेतली, तर दुसरी विकेट १७ व्या षटकात ग्लेन फिलिप्सची (३४) घेतली.

त्याने या सामन्यात केलेल्या अप्रतिम प्रदर्शनानंतर त्याला विचारेले गेले की, मोठ्या काळानंतर पदार्पण केल्यावर कसे वाटत आहे. यावर उत्तर देताना तो म्हणाला की, “देशासाठी खेळणे चांगले वाटत आहे. आज जर तुम्ही क्रिकेटवर प्रेम करत खेळत असाल तर, तुमचे सर्वात मोठे लक्ष्य असते, देशासाठी खेळणे. मी स्वतःला शब्द दिला आहे की, हे हलक्यात घेणार नाही.”

हर्षलला सामन्यापूर्वी अजीत अगरकर आणि नवीन मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी पदार्पणाची कॅप दिली. द्रविडविषयी बोलताना तो म्हणाला की, “राहुल भाईने मला सांगितले की, एकदा तू तुझी तयारी केली की, मग फक्त येथे ये आणि खेळाचा आनंद घे. ९-१० वर्ष देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएल खेळल्यानंतर, हा खूप संतुष्टी देणारा अनुभव आहे.”

दरम्यान, भारतीय संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी केली. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ६ विकेट्सच्या नुकसानावर १५३ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघाने हे लक्ष्य १७.२ षटकात आणि ३ विकेट्च्या नुकसानावार गाठले.

महत्त्वाच्या बातम्या – 

‘त्या’ लाजिरवाण्या प्रकरणी क्षमा मागत टिम पेनने कॅप्टन्सी तर सोडली, पण आता संपूर्ण कारकीर्दच धोक्यात आली!

जरा विचित्रच! बांगलादेशविरुद्ध फलंदाजीवेळी दुर्लक्ष करणे शोएब मलिकला भोवले, ‘असा’ झाला रनआऊट

धक्कादायक! टिम पेनसह तब्बल १५ क्रिकेटर्सचा सेक्स स्कँडलमध्ये समावेश, सर्वाधिक खेळाडू पाकिस्तानचे

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---