---Advertisement---

वयाची तिशी ओलांडल्यानंतरही हर्षलचा दरारा कायम! ‘या’ बड्या विक्रमात चेन्नई, मुंबईकरांवरही ठरलाय सरस

On: गुरूवार, ऑक्टोबर 7, 2021 8:24 AM
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत बुधवारी (६ ऑक्टोबर) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पाहायला मिळाला. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाच्या गोलंदाजी आक्रमणासमोर सनरायझर्स हैदराबाद संघाला ७ बाद १४१ धावा करण्यात यश आले होते. दरम्यान या डावात ३ गडी बाद करणाऱ्या हर्षल पटेलच्या नावे मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे.

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाकडून हर्षल पटेल याने आयपीएल स्पर्धेत अप्रतिम कामगिरी केली आहे. ही कामगिरी त्याने सनरायझर्स हैदराबाद संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात देखील सुरू ठेवली. त्याने या सामन्यात ४ षटक गोलंदाजी केली होती. या दरम्यान त्याने ३३ धावा खर्च करत ३ गडी बाद केले होते. यामध्ये सनरायझर्स हैदराबाद संघाचा कर्णधार केन विलियमसन, जेसन होल्डर आणि वृद्धिमान साहा यांचा समावेश होता. या जोरदार कामगिरीच्या बळावर तो वयाची तिशी ओलांडल्यानंतर आयपीएलच्या एका हंगामात सर्वाधिक गडी बाद करणारा तो गोलंदाज ठरला आहे. त्याचे वय सध्या ३० वर्षे ३१८ दिवस आहे.

हर्षल पटेलने आयपीएल २०२१ स्पर्धेत आतापर्यंत एकूण १३ सामन्यात २९ गडी बाद केले आहेत. तर या यादीत दुसऱ्या स्थानी चेन्नई सुपर किंग्स संघाचा अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्रावो आहे, ज्याने २०१५ मध्ये झालेल्या आयपीएल स्पर्धेत २६ गडी बाद केले होते. तसेच तिसऱ्या स्थानी इमरान ताहीर आहे, ज्याने २०१९ मध्ये झालेल्या आयपीएल स्पर्धेत २६ गडी बाद केले होते. तर चौथ्या स्थानी न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट आहे, ज्याने २०२० मध्ये झालेल्या आयपीएल स्पर्धेत २५ गडी बाद केले होते.

वयाची तिशी ओलांडल्यानंतर आयपीएलच्या एका हंगामात सर्वाधिक गडी बाद करणारे गोलंदाज :
२९ गडी – हर्षल पटेल, २०२१*
२६ गडी – ड्वेन ब्रावो, २०१५
२६ गडी – इमरान ताहीर, २०१९
२५ गडी – ट्रेंट बोल्ट, २०२०

महत्त्वाच्या बातम्या-

‘या’ पाच सुरमांना कायरन पोलार्ड मानतो ‘टी२० चे महारथी’, एका भारतीयाचा समावेश

रोहितमध्ये घुसला ‘ऍक्टिंगचा किडा’, बड्या क्रिकेटरची केली हुबेहुब नक्कल; व्हिडिओ होतोय व्हायरल

विराटचे खास असूनही दुर्लक्ष, दुधातून माशी काढावी तसे ‘या’ ३ खेळाडूंना टी२० विश्वचषकातून ठेवले बाहेर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---