---Advertisement---

हे नवीनच! रोहितनंतर अशी कामगिरी करणारा केवळ दुसरा ‘हॅट्रिकवीर’ ठरला हर्षल

On: सोमवार, सप्टेंबर 27, 2021 9:02 AM
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल २०२१) ३९ वा सामना रविवार रोजी (२६ सप्टेंबर) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात झाला. दुबईच्या मैदानावर झालेल्या या सामन्यात बंगलोरच्या संघाने जबरदस्त सांघिक कामगिरीचे प्रदर्शन करत मुंबईला तब्बल ५४ धावांनी पराभूत केले. या सामन्याचे वैशिष्ट बेंगलोरचा प्रमुख वेगवान गोलंदाज हर्षल पटेल याची हॅट्रिक ठरली. या हॅट्रिकसह त्याने एका खास विक्रमाची नोंद केली.

हर्षलची जबरदस्त हॅट्रिक
मुंबईचा डावातील सतरावे षटक टाकताना हर्षलने सर्वप्रथम हार्दिक पंड्या याला झेलबाद केले. त्यानंतर, कायरन पोलार्डचा त्रिफळा उडवला. अखेरीस, राहुल चहरला पायचीत करून त्याने आपली हॅट्रिक पूर्ण केली. यासह तो आयपीएल २०२१ मध्ये हॅट्रीक घेणारा पहिला गोलंदाज बनला. हर्षल सध्या २३ बळी मिळवून पर्पल कॅपचा मानकरी आहे.

या खास घटनेत सहभागी झाला हर्षल
या जबरदस्त हॅट्रिकसह हर्षल स्वतः हॅट्रिक घेतलेला तसेच, अन्य गोलंदाजाच्या हॅट्रिकमध्ये सामील असलेला केवळ दुसरा खेळाडू ठरला. हर्षल २०१९ मध्ये सॅम करनने घेतलेल्या हॅट्रिक वेळी हर्षल बादही झाला होता. त्यावेळी तो दिल्ली कॅपिटल्सचे प्रतिनिधित्व करत. अशाप्रकारे हॅट्रिक घेण्याचा व दुसऱ्या गोलंदाजाच्या हॅट्रिकमध्ये सामील असणारा पहिला खेळाडू रोहित शर्मा होय. रोहितने २००९ मध्ये डेक्कन चार्जर्सचा भाग असताना मुंबई इंडियन्स विरुद्ध हॅट्रिक घेतली होती. त्यानंतर, २०१७ मध्ये आरसीबीच्या सॅम्युअल बद्रीने मुंबई विरुद्ध हॅट्रिक घेतली असताना, रोहित बादही झाला होता.

मुंबईचा लाजिरवाणा पराभव
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने ६ बाद १६५ धावा बनविल्या होत्या. कर्णधार विराट कोहली व ग्लेन मॅक्सवेल यांनी शानदार अर्धशतके झळकावली. मुंबईसाठी अनुभवी जसप्रीत बुमराहने सर्वाधिक तीन बळी मिळविले. प्रत्युत्तरात, मुंबईला रोहित शर्मा व क्विंटन डी कॉक यांनी अर्धशतकी सलामी दिली. मात्र, रोहित व डी कॉक माघारी परतल्यानंतर इतर कोणताही फलंदाज टिकून खेळू शकला नाही. अखेरीस, हर्षल पटेलने हॅट्रिक नोंदवत मुंबईच्या उरलेल्या अशांना सुरुंग लावला. हर्षलने सर्वाधिक चार बळी मिळवले. या पराभवामुळे मुंबई गुणतालिकेत सातव्या क्रमांकावर घसरली असून, आरसीबीने आपले तिसरे स्थान आणखी मजबूत केेले.

महत्त्वाच्या बातम्या-

हार्दिक, पोलार्डसारख्या दांडग्या फलंदाजांनाही बदडलं, हर्षलच्या हॅट्रिकचा व्हिडिओ बघून म्हणाल, ‘सरस छे’!

वडिलाचे हाल लेकाला बघवले नाहीत, डिव्हिलियर्सला बाद होताना पाहून मुलाचा संताप, व्हिडिओ व्हायरल

‘मी म्हटलं होतं ना…’, चहलने पूर्वसूचना देत इशानचा काढला काटा; पाहा भारी व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---