भारत विरूद्ध बांगलादेश (India vs Bangladesh) संघातील 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळली गेली. या मालिकेत भारताने 2-0 ने मालिका आपल्या खिशात घातली. त्यानंतर भारत-बांगलादेश संघात आगामी 3 सामन्यांची टी20 मालिका खेळली जाणार आहे. त्यासाठी भारतीय संघाची घोषणा देखील झाली आहे. या मालिकेत शेवटच्या आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करणारे युवा चेहरे दिसणार आहेत. तत्पूर्वी आपण अशा 3 खेळाडूंबद्दल जाणून घेऊया, जे बांगलादेशविरूद्धच्या टी20 मालिकेत पदार्पण करू शकतात.
हर्षित राणा- हर्षित राणा (Harshit Rana) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणाची वाट पाहत आहे. आयपीएल 2024 मध्ये त्याच्या उत्कृष्ट कामगिरीने त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. त्याने 13 सामन्यात 9.08च्या इकॉनॉमी रेटने गोलंदाजी करत 19 विकेट्स घेतल्या होत्या. त्याची अचूक लाईन-लेंथ आणि विकेट घेण्याची क्षमता त्याला बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत पदार्पणासाठी उत्कृष्ट ठरू शकते.
मयंक यादव- मयंक यादवच्या (Mayank Yadav) आयपीएल पदार्पणापासूनच त्याच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाची प्रतीक्षा होती. आता तो पूर्णपणे तंदुरुस्त असल्याने त्याचा बांगलादेशविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. मयंक वेगवान गोलंदाज आहे, जो ताशी 150 किलोमीटर वेगाने गोलंदाजी करतो. त्याने 4 आयपीएल सामन्यात 7 विकेट्स घेतल्या होत्या. बांगलादेशविरूद्धच्या टी20 मालिकेत तो पदार्पण करू शकतो.
नितीश कुमार रेड्डी- नितीश कुमार रेड्डीने (Nitish Kumar Reddy) आयपीएल 2024 मध्ये आपल्या अष्टपैलू कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याने 2024च्या आयपीएलमध्ये 13 सामन्यांमध्ये 142.92च्या स्ट्राइक रेटने 303 धावा केल्या. यासह त्याने गोलंदाजीत 3 विकेट्सही घेतल्या होत्या. आगामी टी20 मालिकेत नितीश भारतीय संघात पदार्पण करू शकतो.
भारत-बांगलादेश संघातील पहिला टी20 सामना ग्वाल्हेर येथे होणार आहे. हा सामना (6 ऑक्टोबर) रोजी सायंकाळी 7 वाजता होणार आहे. दुसरा सामना (9 ऑक्टोबर) रोजी अरुण जेटली स्टेडियमवर तर तिसरा आणि शेवटचा सामना (12 ऑक्टोबर) रोजी राजीव गांधी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
बांगलादेशविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी भारतीय संघ- सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, हार्दिक पांड्या, रियान पराग, नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), अर्शदीप सिंग, हर्षित राणा, मयंक यादव
महत्त्वाच्या बातम्या-
IND vs BAN; विजयानंतर बांगलादेशच्या ‘या’ स्टार खेळाडूला कोहलीने गिफ्ट केली बॅट
“राहुल द्रविड आणि गौतम गंभीर…” बांगलादेशला पछाडल्यानंतर कर्णधाराचे मोठे वक्तव्य!
IND vs BAN: यशस्वीने 11व्या कसोटीतच केली सेहवागची बरोबरी, यादीत अन्य भारतीय नाही