शिर्डी। हरियाणाच्या पुरुष फ्रीस्टाईल संघाने जोरदार कामगिरी करत टाटा मोटर्स 23 वर्षाखालील राष्ट्रीय कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेच्या पहिल्या दिवशी चमक दाखवली. महाराष्ट्राच्या शिर्डी येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत एक सुवर्णपदक, चार रौप्यपदक आणि तीन कांस्यपदकांसह एकूण 8 पदकांची कमाई केली. हरियाणा संघाने 158 गुणांची कमाई केली. दुस-या स्थानी सर्विसेस (150 गुण) आणि चंदीगढने 130 गुणांसह तिसरे स्थान पटकावले. या स्पर्धेतील सुवर्णपदक विजेते 28 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर दरम्यान बुडापेस्ट येथे होणा-या 23 वर्षाखालील जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करतील.
यजमान महाराष्ट्राच्या सिकंदर (92 किलो) आणि सुरज (61 किलो) यांनी दोन पदकांची कमाई केली. सिकंदरने हरियाणाच्या सुनिलला 10-6 असे पराभूत केले. तर, सुरजला रविंदरकडून 3-5 असे पराभूत व्हावे लागल्याने रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. सर्विसेसने चार आणि उत्तरप्रदेशने दोन सुवर्णपदक मिळवले.तर, चंदीगढ, हरयाणा व दिल्लीने एक-एक सुवर्णपदकाची कमाई केली.
2017 सालचा ज्युनियर जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील कांस्यपदक विजेता वीर देव गुलिया (79 किलो) याने उत्तरप्रदेशच्या सचिनला 6-3 असे नमविले. तर, नवीनने (70 किलो) हरयाणाच्या विशालला 6-3 असे नमवित सुवर्णपदकाची कमाई केली. 74 किलोच्या अंतिम सामन्यात गौरव (उत्तरप्रदेश) याने हरियाणाच्या प्रितमला 5-0 असे नमविले. 65 किलो वजनीगटात चंदीगढच्या श्रावणने दिल्लीच्या सनीला 4-0 असे नमवित सुवर्णपदक मिळवले.
हरियाणाच्या नवीनने चंदीगढच्या सुमितला 57 किलो गटात नमविले. 97 किलो वजनी गटात दिल्लीच्या आकाश अंतिलने हरयाणाच्या अमितला 12-5 असे, 86 किलो व 125 किलो अंतिम सामन्यात अनुक्रमे संजित (सर्विसेस) आणि आर्यन (उत्तरप्रदेश) यांना वॉकओव्हर मिळाल्याने पदक पटकावले. शनिवारी 28 राज्यातील 10 वजनीगटात 300 महिला कुस्तीगीर सहभाग नोंदवणार आहेत.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–मुलाखत: ऑलिंपिक मेडल एकदिवस नक्कीच जिंकणार – राहुल आवारे
–जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राच्या राहुल आवारेला कांस्यपदक