टी२० विश्वचषकाच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया संघ एकमेकांसमोर आले होते. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा पराभव केला आणि अंतिम सामन्यात धडक मारली होती. पाकिस्तानच्या पराभवासाठी हसन अलीला अनेकांनी जबाबदार ठरवले आहे. हसन अलीने या सामन्यात मॅथ्यू वेडचा एक महत्वाचा झेल सोडला होता आणि त्यानंतर त्या फलंदाजानेच ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला होता. या घटनेनंतर हसनला सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल केले गेले होते. यानंतर आता हसन अलीने संपूर्ण देशाची माफी मागितली आहे.
उपांत्य सामन्यात हसन अलीच्या हातातून एक मोठी चूक घडली आणि त्यानंतर तो ट्रोल झाला होता. सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीवेळी १९ व्या षटकात शाहीन अफ्रिदी गोलंदाजी करत होता. त्याच्या गोलंदाजीवेळी हसनने डीप मिडविकेटव मॅथ्यू वेडचा एक महत्वाचा झेल सोडला. त्याची ही चूक पाकिस्तान संघाला खूपच महागात पडली. त्याने हा झेल सोडल्यानंतर वेडने या षटकात सलग तीन षटकार मारले आणि ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला होता. चाहते त्यामुळे हसनला या सामन्यात मिळालेल्या पराभवासाठी कारणीभूत ठरवत आहेत.
हसनने यापूर्वी २०१७ मध्ये पाकिस्तानसाठी अप्रतिम प्रदर्शन केले होते आणि संघाला चॅम्पियंस ट्रॉफी जिंकवून दिली होती. त्यावेळी सर्वत्र त्याचे कौतुक केले जात होते. मात्र, टी-२० विश्वचषकात त्याने केलेल्या एका चुकीमुळे त्याला खूप ट्रोल केले गेले. असे असले तरी हसनला त्याने केलेल्या चुकीची जाणीव झाली आहे. त्याने त्याच्या अधिकृत ट्वीट खात्यावरून चाहत्यांनी आणि संपूर्ण देशाची माफी मागितली आहे.
त्याने त्याच्या ट्वीटमध्ये लिहिले आहे की, “मला माहीत आहे की, तुम्ही सर्वजण निराश आहात. कारण माझे प्रदर्शन तुमच्या अपेक्षेप्रमाणे नव्हते, पण तुम्ही माझ्यावर अधिक निराश होऊ नका. माझ्याकडून तुमच्या अपेक्षा बदलू नका. मी सर्वोच्च पातळीवर पाकिस्तान क्रिकेटची सेवा करू इच्छितो, त्यामुळे पुन्हा चांगली मेहनत सुरू केली आहे. हा काळ मला मजबूत बनवेल. सर्व संदेश, ट्वीट, पोस्ट, फोन आणि प्रार्थनांसाठी धन्यवाद, याची गरज आहे.”
میرا سینہ تیری حُرمت کا ہے سنگین حصار،
میرے محبوب وطن تُجھ پہ اگر جاں ہو نثارمیں یہ سمجھوں گا ٹھکانے لگا سرمایہِ تن،
اے میرے پیارے وطن 💚🇵🇰 pic.twitter.com/4xiTS0hAvx— Hassan Ali 🇵🇰 (@RealHa55an) November 13, 2021
पाकिस्तानने या टी२० विश्वचषकात सुपर १२ फेरीतील सर्व ५ सामने जिंकून उपांत्य फेरीत धडक मारली होती. मात्र, उपांत्य सामन्यात त्यांना ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवाचा धक्का बसला.
महत्त्वाच्या बातम्या –
वॉर्नरने अर्धशतक तर केलेच, पण ‘हा’ मोठा विक्रमही रचला; विराटचा विश्वविक्रम मात्र अबाधित
टी२० विश्वचषक जिंकला, पण ऑस्ट्रेलियाचा मिशेल स्टार्क ठरला सर्वात महागडा गोलंदाज, पाहा आकडेवारी