टी20 विश्वचषक (T20 World Cup) 2022च्या स्पर्धेत मंगळवारी (18 ऑक्टोबर) सहावा सामना श्रीलंका विरुद्ध संयुक्त अरब अमिराती (युएई) यांच्यात खेळला गेला. या सामन्यात युएईने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाच्या सायमंड्स स्टेडियम, जिलाँग येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात मोठा विक्रम झाला. युएईचा फिरकीपटू कार्तिक मयप्पन याने आंतरराष्ट्रीय टी20मध्ये ऐतिहासिक कामगिरी केली आहे.
कार्तिक मयप्पन (Karthik Meiyappan) याने श्रीलंकेविरुद्ध हॅट्ट्रीक घेण्याची कामगिरी केली आहे. तो टी20 विश्वचषकाच्या इतिहासात हॅट्ट्रीक घेणारा पाचवाच गोलंदाज ठरला आहे. तसेच 2022च्या टी20 विश्वचषकातील ही पहिलीच हॅट्ट्रीक ठरली आहे.
तमिळनाडूच्या चेन्नई येथे जन्मलेल्या 22 वर्षीय कार्तिकने श्रीलंकेच्या 15व्या षटकात ही विलक्षण कामगिरी केली आहे. त्याने 15व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर भानुका राजपक्षे (5), चरिथ असलंका (0) आणि कर्णधार दसून शनाका (0) यांना लागोपाठ तीन चेंडूवर बाद केले. यामुळे तो टी20 विश्वचषकामध्ये हॅट्ट्रीय घेणारा पाचवाच गोलंदाज ठरला आहे.
कार्तिकचा आदर्श ऑस्ट्रेलियाचा महान फिरकीपटू शेन वॉर्न आहे. त्याने श्रीलंकेविरुद्ध 4 षटके टाकताना 19 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. याबरोबरच तो हॅट्र्टीक घेणारा असोसिएशन क्रिकेट संघाचा पहिलाच खेळाडू ठरला आहे. त्याने मागच्याच वर्षी आंतरराष्ट्रीय टी20मध्ये पदार्पण केले. त्याला सुरूवातीला क्रिकेट खेळण्यात रूची नव्हती. कारण जेव्हा तो भारतात होता. तेव्हा तो बुध्दिबळ खेळत होता, मात्र देश बदलल्याने त्याचे मन नसून सुद्धा क्रिकेटकडे वळावे लागले.
पुरूषांच्या टी20 विश्वचषकात पहिली हॅट्ट्रीक घेण्याची कामगिरी ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज ब्रेट ली याने केली आहे. त्याने ही कामगिरी 2007च्या हंगामात बांगलादेशविरुद्ध केली होती. त्यानंतर थेट 2021च्या टी20 विश्वचषकात तब्बल तीन खेळाडूंनी हॅट्ट्रीक नोंदवली. यामध्ये श्रीलंकेचा वानिंदू हसरंगा, आयर्लंडचा कर्टिस कॅम्पर आणि दक्षिण आफ्रिकेचा कगिसो रबाडा यांचा समावेश आहे.
https://www.instagram.com/reel/Cj2ZkF9PqJs/?utm_source=ig_web_copy_link
टी20 विश्वचषकातील हॅट्ट्रीक-
ब्रेट ली विरुद्ध बांगलादेश, 2007
कर्टिस कॅम्पर विरुद्ध नेदरलॅंड्स, 2021
वानिंदू हसरंगा विरुद्ध दक्षिण आफ्रिका, 2021
कगिसो रबाडा विरुद्ध इंग्लंड, 2021
कार्तिक मयप्पन विरुद्ध श्रीलंका, 2022*
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मुलाच्या सिलेक्शनची वेळ आली तेव्हा बीसीसीआयचे नवे अध्यक्ष मिटींगमधून गेले होते बाहेर
टी20 विश्वचषकापूर्वी बीसीसीआयच्या ‘त्या’ एका निर्णयाने पाकिस्तानला झटका, कोटींचा बसणार फटका!