जेव्हाही क्रिकेटवर्तुळात सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांबद्दल चर्चा होते, तेव्हा जॉन्टी ऱ्होड्सचे नाव आल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे त्यालाही अनेकदा त्याच्यादृष्टीने सर्वोत्तम क्षेत्ररक्षक कोण असा प्रश्न बऱ्याचदा विचारण्यात येतो. नुकताच सुरेश रैनाबरोबर इंस्टाग्राम लाईव्ह व्हिडिओ चॅट करतानाही ऱ्होड्सने त्याच्या आवडत्या क्षेत्ररक्षकांबद्दल खुलासा केला आहे.
ऱ्होड्सने भारत आणि जगातील त्याचा आवडत्या क्षेत्ररक्षकांच्या यादीत रविंद्र जडेजाचे नावही सामील केले आहे. रैनाने ऱ्होड्सला भारतातील आणि जगातील आवडत्या क्षेत्ररक्षकांबद्दल प्रश्न विचारला होता.
यावर उत्तर देताना ऱ्होड्स म्हणाला, ‘मला एबी डिविलियर्सला पहायला आवडते, मग तो फलंदाजी करताना असो किंवा क्षेत्ररक्षण. तो चांगले मनोरंजन करतो. मला वाटते न्यूझीलंडचा मार्टिन गप्टिल देखील चांगला क्षेत्ररक्षक आहे.’
त्यानंतर जडेजाचे कौतुक करताना ऱ्होड्स म्हणाला, ‘मग जड्डू. तो पण चांगला आहे. मी नेहमी म्हणत असतो की वरच्या बाजूने थ्रो केला पाहिजे, परंतु तो नेहमीच साईड-आर्मने (बाजूने) थ्रो करत असतो, तरीही तो चुकलेला दिसत नाही. तो तूमच्यापेक्षा आणि माझ्यापेक्षा खूप वेगळा आहे. तो थोडा मायकल बेवन सारखा आहे.’
‘तो मैदानात चपळ आहे. त्याला कधी तूम्ही स्लाईड किंवा डाइव्ह करताना पाहिले नसेल. कारण त्याच्याकडे तेवढी चांगली गती आहे, की तो चेंडूला रोखू शकतो. तू आणि मी झटकन उठणारे आहोत. आपण घाणेरडे क्षेत्ररक्षक आहोत. आपण मैदानात पडतो किंवा घसरतो, स्वत:ला खराब करुन घेतो आणि चपळाईने लगेच उठतो.’ असे गमतीने ऱ्होड्सने जडेजाचे कौतुक करताना म्हटले.
तसेच पुढे ऱ्होड्स म्हणाला, ‘जड्डू किंवा मायकल बेवन सारख्या खेळाडूंची गती अविश्वसणीय असते. तूम्ही त्यांना क्वचितच डाइव्ह करताना पाहता. बऱ्याचदा ते बाऊंड्री जवळ डाइव्ह करतात. जड्डूने सध्या कसोटी आणि वनडेत काही अफलातून झेल घेतले आहेत. त्याच्या या यशाची किल्ली त्याचे पूर्ण समर्पण ही आहे. त्याच्याकडे मोठी तलवार आहे. तो खूप शूर आहे.’
ट्रेंडिंग घडामोडी –
महान क्रिकेटर म्हणतोय, विराट- रोहितपैकी ‘हा’ खेळाडू करणार टी२०मध्ये द्विशतक
वनडे कारकिर्दीत १० पेक्षा जास्त वेळा शून्यावर बाद झालेले भारतीय क्रिकेटपटू, अव्वल क्रमांकावर आहे…
टीकटॉक स्टार झालेल्या चहलला टीकटॉक चाहत्यांनीच केले ट्रोल