विश्वचषक 2023 स्पर्धेच्या 27 व्या सामन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड आमने-सामने आहेत. या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. तसेच, ऑस्ट्रेलियाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. यावेळी ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि ट्रेविस हेड यांनी विस्फोटक फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाला 388 पर्यंत मजल मारून दिली. यादरम्यान हेड वॉर्नर यांचा खेळ पाहून अनेकांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
ऑस्ट्रेलियाकडून यावेळी डेविड वॉर्नर (David Warner) आणि ट्रेविस हेड (Travis Head) यांनी सुरुवातीपासूनच फटकेबाजी करण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे, त्यांनी पॉवरप्लेमध्ये म्हणजेच पहिल्या 10 षटकात विश्वचषकातील दुसरी सर्वाधिक 118 धावसंख्या उभारली. त्यांनी आपली भागीदारी अशीच पुढे नेत संघाला 175 धावांची सलामी दिली. यासाठी त्यांनी केवळ 19.1षटके खर्च केली.
वॉर्नर याने अवघ्या 65 चेंडूंमध्ये पाच चौकार व सहा षटकारांच्या मदतीने 81 धावा केल्या. तर विश्वचषकातील आपला पहिला सामना खेळत असलेल्या हेड याने 67 चेंडूंमध्ये 10 चौकार व 7 षटकारांच्या मदतीने 109 धावा कुटल्या.
यानंतर सोशल मीडियावर त्यांची तुलना थेट ऑस्ट्रेलियाचे माजी सलामीवीर मॅथ्यू हेडन व ऍडम गिलख्रिस्ट यांच्याशी होऊ लागली. एकाने पोस्ट करत लिहिले,
Warner and Head talking us back to the prime 2000's era of Haydos and Gilly ?
What say @bhogleharsha@vikramsathaye@SriniMaama16— Kiran1997 (@Kiran1997432223) October 28, 2023
‘हेड व वॉर्नर आपल्याला 2000 च्या काळात घेऊन जात हेडस व गिली याची आठवण करून देत आहेत.’
Travis Head and David Warner today remind of Mathew Hayden and Adam Gilchrist.
What a era Australia team had …#AUSvsNZ #NZvsAUS #AUSvNZ pic.twitter.com/UpYUOfQmGk
— Er Amit Chaudhary (@kambojamit47) October 28, 2023
ऑस्ट्रेलिया संघासाठी 2000 नंतर हेडन व गिलख्रिस्ट यांनी आक्रमक खेळाचे नवे प्रारूप समोर आणले होते. विशेष म्हणजे ही जोडी देखील हेड वॉर्नर यांच्याप्रमाणे डाव्या हाताने फलंदाजी करत.
(Head And Warner Reminds Hayden And Gilchrist After Batting Against Newzealand In World Cup)
हेही वाचा-
मॅक्सवेलने मारला World Cup 2023चा सर्वात लांब षटकार, तुटला ‘या’ भारतीयाचा रेकॉर्ड, पाहा अफलातून व्हिडिओ
ट्रेविस हेडने रचला मोठा विक्रम, ‘अशी’ कामगिरी करणारा ठरला चौथा खेळाडू