मंगळवारी (18 एप्रिल) सनरायझर्स हैदराबाद संघ आपले होम ग्राउंड असणाऱ्या राजीव गांधी आंतरारष्ट्रीय स्टेडियमवर मुंबई इंडियन्सकडून पराभूत झाला. मुंबईने आयपीएल 2023 हंगामातील आपला हा पाचवा सामना 14 धावांनी जिंकली. मुंबईसाठी वरच्या फळीतील कॅमरुन ग्रीन (64) याने अर्धशतक ठोकले. पण दुसरीकडे हैदराबादसाठी एकही फलंदाज अर्धशतक करू शकला नाही. याच पार्श्वभूमीवर हैदराबादचे मुख्य प्रशिक्षक ब्रायन लारा यांनी सामना संपल्यानंतर संघातील फलंदाजांना, खासकरून मध्यक्रमातील फलंदाजांना पराभवासाठी कारणीभूत ठरवले.
मुंबई इंडियन्सकडून पराभव स्वीकारल्यानंतर सनरायझर्स हैदराबादचे प्रशिक्षक ब्रायन लारा (Brian Lara ) माध्यमांशी चर्चा करण्यासाठी आले. यावेळी लारा म्हणाले की, “विकेट गमावल्यानंतर संघ दबावात येत आहे. आपण जेव्हा कधी विजय मिळवला आहे, त्यात सलामीवीर फलंदाजांनी चांगले प्रदर्शन केले आहे. तुमचा फलंदाजी क्रम किती भक्कम आहे, यावर गोष्टी अवलंबून नसतात. योग्य फलंदाजांना धावा करण्याची संधी मिळावी, ही गोष्टी सुनिश्चित करता आली पाहिजे. हीच गोष्ट या सामन्यात जमली नाही.”
मुंबईविरुद्धच्या पराभवाचे खापर लारांनी हैदराबदच्या मध्यक्रमातील फलंदाजांवर फोडले. तसेच इतर आयपीएल संघांच्या तुलनेत हैदराबादचा मध्यक्रम कमजोर असल्याचेही मान्य केले. लारा म्हणाले की, “आमच्या संघाचा मध्यक्रम परिपक्व नाहीये. अधिक वेळ खेळपट्टीवर टिकून संघाला विजय मिळवून देऊ शकतील, असे खेळाडू संघाला हवे आहेत. आयपीएलमध्ये राहुल तेवतिया, डेविड मिलर यांसारखी उदाहरणे आहेत. आम्हालाही तसे फलंदाज हवे आहेत. आम्ही त्या दृष्टीने प्रयत्न करत आहोत. पण आजच्या सामन्यात आमचा संघ अपेक्षित नव्हता, हे स्वीकार केलेच पाहिजे. आम्ही चालू हंगामातील पहिल्या पाचही सामन्यात पावरप्लेमध्ये कूप विकेट्स गमावल्या आहेत. त्यामुळे आम्ही सुरुवातीपासून दबावात होतो. यात संघाला सुधारणा करावी लागेल.”
मुंबईसाठी युपा फलंदाज तिलक वर्मा याने 17 चेंडूत 37 धावांची वादळी खेळी केली. सामना संपल्यानंतर बोलताना तो कोणत्याही क्रमांकावर फलंदाजीसाठी तयार आहे, अशी प्रतिक्रिया तिलकने दिली. “मी कोणत्याही क्रमांकावर खेळण्यासाठी तयार आहे. मी परिस्थिती पाहून फलंदाजी करण्यासाठी स्वतःला तयार केले आहे. मी संघ व्यवस्थापनाला देखील सांगितले आहे की, ते मला कोणत्याही क्रमांकावर उतरवू शकतात.” (Head coach Brian Lara criticized the Sunrisers Hyderabad batsmen after their loss to Mumbai Indians)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
लखनऊविरुद्धच्या सामन्यापूर्वीच चहलचा मोठा खुलासा! म्हणाला, आम्ही ‘या’ नियमाचा सर्वाधिक फायदा उचलला
अखेर 14 वर्षांचा वनवास संपला! अर्जुनने घडवून आणली क्रिकेट इतिहासातील अतिदुर्मिळ घटना