---Advertisement---

व्हिसा मिळूनही झिम्बाब्वेचे प्रशिक्षक लालचंद राजपूत संघासोबत गेले नाही पाकिस्तानला, जाणून घ्या कारण

---Advertisement---

पाकिस्तानमध्ये 30 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या वनडे मालिकेसाठी झिम्बाब्वे संघ रवाना झाला आहे. मात्र झिम्बाब्वे संघाचे मुख्य प्रशिक्षक लालचंद राजपूत यांच्या अनुपस्थितीत ही मालिका होणार आहे. पाकिस्तान दौऱ्यासाठी प्रशिक्षक लालचंद राजपूत यांना सूट देण्यात यावी, असे हरारे येथील भारतीय दुतावास यांनी म्हटले आहे.

पाकिस्तानच्या दूतावासाने दिला होता व्हिसा 

राजपूत यांच्या अनुपस्थितीत गोलंदाजी प्रशिक्षक डग्लस होंडो ही जबाबदारी पार पाडतील. झिम्बाब्वे क्रिकेटने अधिकृत ट्विटर अकाउंटवरून ट्वीट केले की, “हरारे येथील भारतीय दूतावासाने राजपूत यांना पाकिस्तान दौर्‍यावर सूट देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे ते या दौऱ्यावर जाणार नाहीत. त्यांना हरारे येथील पाकिस्तान दूतावासाने व्हिसा दिला होता.”

भारत सरकारच्या सूचनांनुसार मागितली सूट 

ईएसपीए क्रिकइन्फो या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, “भारत सरकारच्या नागरिकांच्या प्रवासाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार भारतीय दूतावासाने सूट मागितली होती.”

ही झिम्बाब्वे क्रिकेटची अंतर्गत बाब 

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या (पीसीबी) प्रवक्त्याने याला झिम्बाब्वे क्रिकेटची अंतर्गत बाब असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले, “झिम्बाब्वेच्या क्रिकेट अधिकाऱ्यांनी हरारे येथील पाकिस्तान उच्चायुक्तांकडून लालचंद राजपूत यांना व्हिसा मिळवून दिला होता. जर ते या दौऱ्यावर येत नसेल, तर ही झिम्बाब्वे क्रिकेट आणि राजपूत यांच्यातील अंतर्गत बाब आहे.”

झिम्बाब्वे बोर्डमध्ये आहे चिंतेचे वातावरण 

पीसीबीच्या वरिष्ठ सूत्रांनी सांगितले की, “भारत सरकारच्या सूचनांमुळे राजपूत यांना पाकिस्तान दौर्‍यावर येऊ दिले नाही, त्यामुळे झिम्बाब्वे बोर्डमध्ये चिंता निर्माण झाली आहे. दोन्ही देशांमधील तणावपूर्ण संबंधांमुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यात द्विपक्षीय क्रिकेट संबंध नाहीत.”

बीसीसीआयच्या अनुमतीची आहे प्रतीक्षा 

पुढे बोलताना ते म्हणाले, “पुढील वर्षी जानेवारी ते फेब्रुवारी या कालावधीत भारतात टी20 विश्वचषक स्पर्धा होणार आहे. आयसीसी आणि बीसीसीआयच्या व्हिसासाठी देण्यात येणाऱ्या अनुमतीची पीसीबी प्रतीक्षा करत आहे.”

सुरक्षा देण्याचे पीसीबीचे कर्तव्य 

“व्हिसा दिल्यानंतरही राजपूत यांना पाकिस्तानात येण्यापासून रोखण्यात काही अर्थ नाही. नियमांनुसार भेट देणाऱ्या संघांना सर्वोत्तम सुरक्षा देण्याचे पीसीबीचे कर्तव्य आहे,” असेही पुढे बोलताना सूत्रांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या-

-शिखर ‘द वन’..! सलग २ आयपीएल सामन्यात शतक ठोकत घडवला इतिहास

-शतक झळकावूनही शिखर धवनने केला ‘हा’ नकोसा विक्रम

-IPL 2020 : शिखर धवनच्या शतकानंतर ऑरेंज कॅपची स्पर्धा रंगतदार, तर पर्पल कॅप ‘या’ विदेशी खेळाडूच्या डोक्यावर

ट्रेंडिंग लेख-

-ऐंशीच्या दशकातील पैसा वसूल सामना.! एकट्या ‘ऍलन लॅम्ब’ यांनी वेस्टइंडीजच्या जबड्यातून विजय खेचला

-आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने खेळलेले ३ भारतीय खेळाडू

-धवनच्या शतकी खेळीनंतरही का झाला दिल्लीचा पंजाबविरुद्ध पराभव, जाणून घ्या ५ कारणे

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---