भारतीय संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा अवघ्या 3 दिवसांनी सुरू होत आहे. भारतीय संघ एक महिन्यासाठी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात 3 टी20, 3 वनडे आणि 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. या दौऱ्याला सुरुवात होण्यापूर्वी भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड याने मोठे विधान केले आहे. त्याने या दौऱ्यावर जाणाऱ्या प्रत्येक भारतीय खेळाडूला सामना जिंकून देणारे योगदान देण्यास सांगितले आहे.
भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा (India Tour of South Africa) डर्बनमध्ये 10 डिसेंबरपासून 3 सामन्यांच्या टी20 मालिकेने होत आहे. या मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याच्याकडे आहे.
काय म्हणाला द्रविड?
या दौऱ्यापूर्वी राहुल द्रविड (Rahul Dravid) म्हणाला की, “फलंदाजी करण्यासाठी ही एक आव्हानात्मक जागा आहे. याविषयी आकडे तुम्हाला सांगतील. इथे फलंदाजी करण्यासाठी खूप कठीण स्थानांपैकी एक आहे. खासकरून सेंच्युरियन आणि जोहान्सबर्ग ही ठिकाणं. खेळपट्टीत बदल होत राहतो. प्रत्येक फलंदाजाकडे आपली एक योजना असेल की, त्यांना कशाप्रकारे पुढे जायचे आहे. जोपर्यंत ते याविषयी स्पष्ट आहेत, ते यासाठी वचनबद्ध आहेत आणि यासाठी सराव करत आहेत, हे ठीक आहे.”
‘फलंदाजांना दाखवावा लागेल दम’
पुढे बोलताना द्रविड असेही सांगितले की, आफ्रिका खंडात खेळण्यासाठी शारीरिक कणखरतेपेक्षा मानसिक कणखरताही गरजेचा असेल. तो म्हणाला, “आम्ही प्रत्येकाकडून एकसारखे खेळण्याची अपेक्षा करत नाहीत. आमची इच्छा आहे की, त्यांनी याबाबत स्पष्ट असावे की, त्यांच्यासाठी काय कार्य करते. त्यानंतर त्यावर कार्य करण्यास सक्षम असावे. खेळाडू जेव्हा तिथे पोहोचतात, तेव्हा हे अधिक मानसिक असते आणि मला वाटते की, तुम्हाला माहितीये, आपण प्रयत्न करतो आणि या वस्तुस्थितीवर जोर देतो की, जर आपण पुढे गेलो, जर आपल्याला सेट होण्याची संधी मिळाली, तर त्यांनी सामना जिंकून देण्यात योगदान द्यावे.”
भारतीय संघ 26 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भिडणार आहे. खरं तर, भारताने दक्षिण आफ्रिकेला कधीच परदेशात खेळताना कसोटी मालिकेत हरवले नाहीये. अशात रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखाली भारत ही कामगिरी करून दाखवतो की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. (head coach rahul dravid reveals how team india will won the series in south africa ind vs sa)
हेही वाचा-
पाकिस्तानचा प्रशिक्षक बनण्याच्या प्रश्नावर भारतीय दिग्गजाच्या उत्तराने माजवली खळबळ; म्हणाला, ‘मी तयार…’
डॅनियल वॅट आणि नेट-सायव्हर ब्रांट यांच्या ताबडतोड खेळीनंतर सोफीचा कहर, महिला टी-20त इंग्लंडचा भारतावर विजय