दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (South Africa vs India) या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये पहिला कसोटी सामना सुरू आहे. ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना सेंच्युरियनच्या मैदानावर (Centurion ground) सुरू आहे. या सामन्यातील सुरुवातीच्या तीनही दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला राहिला आहे. सामन्याच्या चौथ्या दिवशी (२९ डिसेंबर) भारतीय संघातील फलंदाज मोठी धावसंख्या उभारून दक्षिण आफ्रिका संघासमोर मोठे आव्हान ठेवण्याच्या तयारीत आहेत. दरम्यान चौथ्या दिवसाचा खेळ सुरू होण्यापूर्वीच मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांना मोठा मान मिळाला आहे.
इंग्लंडच्या लॉर्ड्स (lords ground) मैदानावर क्रिकेटचा सामना सुरू होण्यापूर्वी मानाची घंटा वाजवण्याची प्रथा आहे. ही घंटा वाजल्यानंतर सामन्याला सुरुवात होत असते. तसेच कोलकाताच्या ईडन गार्डन मैदानावर देखील मानाची घंटा वाजवली जाते. तर सेंच्युरियनच्या सुपरस्पोर्ट स्टेडियममध्ये (Centurion super sport stadium) देखील मानाची घंटा वाजवून सामन्याला सुरुवात केली जाते. दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यातील चौथ्या दिवसाचा खेळ सुरू करण्याचा मान राहुल द्रविड यांना मिळाला आहे.( Rahul Dravid ring the bell of centurion super sport stadium)
बीसीसीआयने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर फोटो शेअर कर याची माहिती दिली आहे. त्यांनी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा मानाची घंटा वाजवत असल्याचा फोटो शेअर केला आहे. तुम्ही फोटोमध्ये पाहू शकता की, हा मान मिळाल्यानंतर राहुल द्रविड यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.
बीसीसीआयने हा फोटो शेअर करत लिहिले आहे की, ” सुपरस्पोर्ट पार्कची परंपरा. मुख्य प्रशिक्षक, राहुल द्रविड यांनी चौथ्या दिवशी खेळ सुरू होण्यापूर्वी घंटा वाजवली.”
Just SuperSport Park traditions 👌
Head Coach, Rahul Dravid rung the bell before start of play on Day 4⃣#TeamIndia | #SAvIND pic.twitter.com/Rut3XEGXuf
— BCCI (@BCCI) December 29, 2021
दुसऱ्या दिवशी (२७ डिसेंबर) पाऊस पडल्यामुळे खेळ रद्द करण्यात आला होता. पावसाचा फायदा वेगवान गोलंदाजांना झाला, ज्यामुळे सामन्याच्या तिसऱ्या दिवशी वेगवान गोलंदाजांचा बोलबाला पाहायला मिळाला. तिसऱ्या दिवशी १८ गडी बाद २६८ धावा झाल्या. भारतीय संघाने पहिल्या डावात ३२७ धावा केल्या. तर प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिका संघाला १९७ धावा करण्यात यश आले. यासह भारतीय संघाने पहिल्या डावात १४६ धावांची आघाडी घेतली आहे.
महत्वाच्या बातम्या :
खरा कर्णधार..! दुखापतीनंतर मैदानावर परतलेल्या बुमराहसाठी कर्णधार कोहलीची मन जिंकणारी कृती
सिराजवर चढला रोनाल्डोचा फिव्हर, पहिली विकेट घेतल्यानंतर जबरदस्त प्रदर्शन करत लुटली मैफिल
हे नक्की पाहा :