आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने नुकत्याच जाहीर केलेल्या क्रमवारीत भारतीय संघाने ६ व्या स्थानावरुन ५ व्या स्थानी झेप घेतली आहे.
जागतिक हॉकी क्रमवारीत भारतीय संघाने १४८४ गुण घेत, १४५६ गुण असलेल्या जर्मनीला मागे टाकत पाचवे स्थान पटकावले.
नेदरलॅन्ड्स मध्ये २३ जुन ते १ जुलै या दरम्यान पार पडलेल्या हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारताने सलग दुसऱ्यांदा उपविजेतेपद पटकावले. याचा भारतीय संघाला जागतिक क्रमवारीतील स्थान सुधारण्यास फायदा झाला.
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारताला पराभूत करणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाचे क्रमवारीतील अव्वल स्थान कायम आहे.
जागतिक हॉकी क्रमवारीतील अव्वल पाच संघ-
ऑस्ट्रेलिया- १९०६ गुण
अर्जेंटीना- १८८३ गुण
बेल्जियम- १७०९ गुण
नेदरलॅन्ड्स- १६५४ गुण
भारत- १४८४ गुण
महत्त्वाच्या बातम्या-
-श्रेष्ठ कोण, मेस्सी की रोनाल्डो? ख्रिस्तियानो रोनाल्डोने दिले उत्तर
-तब्बल नऊ एकदिवसीय मालिकेनंतर भारतीय संघावर आली ही वेळ