---Advertisement---

‘अपेक्षा आहे, या खेळीमुळे माझी कारकिर्द लांबेल’, भारताविरुद्ध ८१ धावा करणाऱ्या क्लासेनचे लक्षवेधी विधान

On: सोमवार, जून 13, 2022 12:37 PM
Heirich-Klaseen
---Advertisement---

कटक| भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेतील दुसरा टी२० सामना रविवारी (१२ जून) पार पडला. या सामन्यात पाहुण्या दक्षिण आफ्रिकेने ४ विकेट्स राखून विजय मिळवला. हा दक्षिण आफ्रिकेचा सलग दुसरा विजय होता. या विजयासह त्यांनी ५ सामन्यांच्या टी२० मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या या विजयाचा शिल्पकार राहिला, हेन्रिच क्लासेन. ३० वर्षीय क्लासेनने दबावाच्या परिस्थितीत मोठी खेळी करत संघाला १८.२ षटकात विजय मिळवून दिला.

आपल्या मॅच विनिंग खेळीनंतर क्लासेनने (Heinrich Klaasen) त्याच्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच त्याने संघाचा यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉक याच्या दुखापतीविषयी अपडेटही दिली आहे.

क्लासेन म्हणाला की, “मला आनंद आहे की, ही खेळी भारतीय संघाविरुद्ध आली. मला अपेक्षा आहे या खेळीमुळे माझी कारकिर्द अजून लांबेल. मी मागील काही वर्षांत चांगले प्रदर्शन केलेले नाही. परंतु भारतात येऊन मी स्वत:ला नशीबवान समजत आहे. सुरुवातीला मला नव्या चेंडूचा सामना करणे अवघड वाटत होते. त्यामुळे मी फिरकीपटूंना निशाणा बनवण्यासाठी प्रयत्न केले.” 

तसेच पुढे बोलताना क्लासेनने दक्षिण आफ्रिका संघाच्या सपोर्ट स्टाफमधील सदस्यांचे आभार मानले. क्लासेन म्हणाला की, “सपोर्ट स्टाफमधील सदस्यांनी माझे समर्थन केले. त्यांच्या पाठिंब्यासाठी मी खुश आहे. ही खेळी त्यांच्यासाठीच होती.”

क्विंटन डी कॉकच्या दुखापतीविषयी दिले अपडेट
दुखापतीमुळे डी कॉक या सामन्यात खेळू शकला नव्हता. त्याच्या दुखापतीविषयी माहिती देताना क्लासेन म्हणाला की, “क्विन्नी बसमध्ये असताना माझ्याजवळ आला आणि मला सांगितले की, त्याच्या मनगटाला दुखापत झाली आहे. सामन्यापूर्वीच्या एक दिवस आधी त्याचा हात खूप टणक झाला होता आणि तेव्हा मला समजले की, मी येत्या सामन्यात खेळणार आहे.”

हेन्रिच क्लासेनची मॅच विनिंग खेळी
भारताच्या १४९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची वरची फळी फेल ठरली. मात्र मधल्या फळीत फलंदाजीला येत क्लासेनने संघाचा डाव सावरला. त्याने ४६ चेंडूत ५ षटकार आणि ७ चौकारांच्या मदतीने ८१ धावांची क्लास खेळी केली. सुरुवातीला १२ चेंडूत तो ४ धावाच करू शकला होता. परंतु पुढे २० चेंडूत ४६ धावा करत त्याने अर्धशतक पूर्ण केले होते.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

सामना हातात असताना ‘इथे’ झाली चूक, नाहीतर विजय आमचाच होता; रिषभ पंतची प्रतिक्रिया

भारत-दक्षिण आफ्रिकेतील सामन्याला ओडिसाच्या CM पटनायक यांनी लावली उपस्थिती, गांगुलीशीही गाठभेट

फक्त निराशा! दुसऱ्या टी२० सामन्यातही भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेकडून पराभवाचा धक्का, पाहुणे २-०ने आघाडीवर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---