---Advertisement---

राशिद खानने अवघ्या ९ चेंडूत ठोकल्या २७ धावा, तुफानी खेळीदरम्यान मारला ‘हेलिकॉप्टर शॉट’, व्हिडिओ व्हायरल

On: बुधवार, ऑगस्ट 25, 2021 5:17 PM
---Advertisement---

इंग्लंडमध्ये टी -२०ब्लास्ट लीग स्पर्धेचा थरार पाहायला मिळत आहे. या स्पर्धेतील प्रत्येक सामन्यात असा काहीतरी प्रकार घडत आहे, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात राशिद खानने आपल्या गोलंदाजीने नव्हे तर फलंदाजीने धुमाकूळ घातला आहे. त्याने आपल्या खेळी दरम्यान हेलिकॉप्टर शॉट देखील खेळला होता. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय.

मंगळवारी (२४ ऑगस्ट) यॉर्कशायर विरुद्ध ससेक्स या दोन्ही संघांमध्ये उपांत्यपूर्व फेरीतील सामना पार पडला. या सामन्यात यॉर्कशायर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यॉर्कशायर संघाकडून प्रथम फलंदाजी करताना, टॉम – कोलहेर काडमोरने ५५ आणि बॅलेन्सने ५५ धावांची खेळी केली होती. या खेळीसह यॉर्कशायर संघाला ७ गडी बाद १७७ धावा करण्यात यश आले होते.

ससेक्स संघाला हा सामना जिंकण्यासाठी १७८ धावांची आवश्यकता होती. या धावांचा पाठलाग करताना सलामीवीर फलंदाज ल्यूक राईटने चांगली सुरुवात करून देत ५४ धावांची खेळी केली होती. तसेच रॉलिंसनेही हातभार लावत २७ धावांची खेळी केली होती. परंतु, राशिद खान जेव्हा फलंदाजी करण्यासाठी आला होता, त्यावेळी ससेक्स संघाला विजयासाठी २१ चेंडूंमध्ये ४३ धावांची आवश्यकता होती.

राशिद खानने दुसऱ्याच चेंडूवर षटकार मारत स्पष्ट केले होते की, तो या सामन्यात संघाला विजय मिळवून देऊ शकतो. त्याने या डावात ९ चेंडूंमध्ये ३०० च्या स्ट्राइक रेटने २७ धावांची खेळी केली. या खेळी दरम्यान त्याने ३ तीन चौकार आणि २ गगनचुंबी षटकार लगावले होते.  यासह त्याने ससेक्स संघाला ५ गडी राखून विजय मिळवून दिला.

त्याने या खेळी दरम्यान हेलिकॉप्टर शॉट देखील मारला होता. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. (Helicopter shot played by Rashid Khan,watch video)

यापूर्वी देखील राशिदने फलंदाजी करताना हेलिकॉप्टर शॉट मारला आहे. तसेच त्याने दावा केला होता की, त्याला चांगल्या गोलंदाजीसह चांगली फलंदाजी करून अष्टपैलू खेळाडूची भूमिका पार पाडायची आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

अँडरसनने ओलांडली ‘द वॉल’! द्रविडला मागे सोडत केला ‘हा’ विक्रम

कारकिर्दीत केवळ चौथ्यांदा विराटने घेतला ‘हा’ निर्णय

हवेत उडला फावद आलम, टिपला अविश्वसनीय झेल, पाहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---