दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमा भारताविरुद्धच्या सेंच्युरियन कसोटीत जखमी झाला आहे. यानंतर टेंबा बावुमाला मैदान सोडावे लागले. टेंबा बावुमा फलंदाजीला येणार की नाही हे सध्या स्पष्ट नाही. मात्र, दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू हर्शल गिब्स याने टेम्बा बावुमाबद्दल एक केली केली आहे. हर्शल गिब्सने पोस्टमध्ये लिहिले की, “अनफिट खेळाडूंना संघात खेळण्याची परवानगी कशी मिळते.”
हर्शल गिब्स (Herschelle Gibbs) याने या पोस्टमध्ये पुढे लिहिले की, “विडंबना अशी आहे की, जेव्हा प्रशिक्षकाने 2009 मध्ये प्रोटीज प्रशिक्षक म्हणून सुरुवात केली तेव्हा त्यांनी काही खेळाडूंना खेळण्याची परवानगी दिली जे स्पष्टपणे अयोग्य होते.” तर त्याने मर्यादित षटकांच्या फॉरमॅटमध्ये दक्षिण आफ्रिकेचे प्रशिक्षक असणारे रॉब वॉल्टर यांच्यावरही निशाणा साधला. हर्शेल गिब्सने लिहिले की, “रॉब वॉल्टर 2009 मध्ये एक ताकद आणि कंडिशनिंग ट्रेनर होता.”
Ironic that the coach allows some players who are clearly unfit and overweight to play when he started off as proteas trainer in 2009🙄
— Herschelle Gibbs (@hershybru) December 26, 2023
टेंबा बावुमा (Temba Bavuma) याला विश्वचषक 2023 च्या उपांत्य फेरीपूर्वी हाताच्या दुखापतीचा सामना करावा लागला होता. याशिवाय संपूर्ण विश्वचषकात टेंबा बावुमाची कामगिरी निराशाजनक होती. या मालिकेपूर्वी भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळली गेली होती, टेम्बा बावुमाला वनडे मालिकेत स्थान मिळाले नव्हते. टेंबा बावुमाच्या अनुपस्थितीत एडन मार्करम (Aidan Markram) याने कर्णधारपदाची धुरा सांभाळली. त्याचवेळी टेंबा बावुमा भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेतून संघात परतला आहे. पण हे पुनरागमन दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधारासाठी संस्मरणीय ठरले नाही. वास्तविक, टेंबा बावुमा पुन्हा एकदा दुखापतीचा बळी ठरला. मात्र, टेंबा बावुमा फलंदाजीला येतो की नाही, हे पाहायचे आहे. (Herschel Gibbs rages at captain Bavuma Said He’s fat and unfit)
हेही वाचा
IND vs SA: मास्टर ब्लास्टरही झाला राहुलच्या खेळीचा चाहता; म्हणाला, ‘असे तेव्हा होते जेव्हा तुम्ही…’
बजरंग आणि साक्षीनंतर विनेश फोगाटचा मोठा निर्णय, पंतप्रधानांनी पत्र लिहून परत केले पद्मश्री आणि अर्जून पुरस्कार