गयाना। वेस्ट इंडीज विरुद्ध भारत संघात मंगळवारी(6 ऑगस्ट) तिसरा आणि टी20 मालिकेतील शेवटचा सामना पार पडला. प्रोविडन्स स्टेडियमवर पार पडलेल्या या टी20 सामन्यात भारताने 7 विकेट्सने विजय मिळवत 3 सामन्यांची टी20 मालिका 3-0 अशी जिंकली.
भारताच्या या विजयात कर्णधार विराट कोहलीने 45 चेंडूत 59 धावांची आणि यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतने 42 चेंडूत नाबाद 65 धावांची अर्धशतकी खेळी करत महत्त्वाचा वाटा उचलला.
याबरोबरच रिषभने एमएस धोनीच्या एका खास विक्रमाला मागे टाकले आहे. रिषभ आता आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये सर्वोच्च वैयक्तिक धावांची खेळी करणारा भारतीय यष्टीरक्षक फलंदाज ठरला आहे. त्याने एमएस धोनीच्या 2017 ला इंग्लंड विरुद्ध केलेल्या 56 धावांच्या विक्रमाला मागे टाकले आहे.
तसेच पंत हा यष्टीरक्षक फलंदाज म्हणून भारताकडून आंतरराष्ट्रीय 20मध्ये अर्धशतकी खेळी करणारा एमएस धोनीनंतरचा दुसराच क्रिकेटपटू ठरला आहे. धोनीने आंतरराष्ट्रीय टी20मध्ये यष्टीरक्षक फलंदाज म्हणून 2 अर्धशतके केली आहेत.
आंतरराष्ट्रीय टी20मध्ये वैयक्तिक सर्वोच्च धावांची खेळी करणारे यष्टीरक्षक-
65* धावा – रिषभ पंत (विरुद्ध वेस्ट इंडीज, 2019)
56 धावा – एमएस धोनी (विरुद्ध इंग्लंड, 2017)
52* धावा – एमएस धोनी (विरुद्ध दक्षिण आफ्रिका, 2018)
49 धावा – एमएस धोनी (विरुद्ध न्यूझीलंड, 2017)
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–असा पराक्रम करणारा रिषभ पंत पहिलाच भारतीय क्रिकेटपटू!
–धोनी, रोहित पाठोपाठ कर्णधार कोहलीनेही केला हा खास पराक्रम
–दोन दिवसापूर्वीच रोहित शर्माने केलेल्या विश्वविक्रमाची किंग कोहलीने केली बरोबरी