---Advertisement---

२०१३ पासून हा विक्रम आहे केवळ रोहित शर्माच्याच नावावर!

On: बुधवार, डिसेंबर 18, 2019 6:27 PM
---Advertisement---

विशाखापट्टणम। आज(18 डिसेंबर) भारत विरुद्ध वेस्ट इंडिज(India vs West Indies) संघात दुसरा वनडे सामना सुरु आहे. या सामन्यात भारताचा उपकर्णधार रोहित शर्माने(Rohit Sharma) दिडशतकी खेळी केली आहे. याबरोबरच त्याने खास विक्रमही केला आहे.

आज रोहितने 138 चेंडूत 17 चौकार आणि 5 षटकारांसह 159 धावा केल्या. त्यामुळे तो वनडेत 2019 या वर्षात आत्तापर्यंतचा भारताकडून सर्वोच्च धावांची वैयक्तिक खेळी करणारा फलंदाज ठरला आहे.

विशेष म्हणजे 2013 पासून रोहितच भारताकडून वनडेत प्रत्येकवर्षी सर्वोच्च धावांची वैयक्तिक खेळी करणारा फलंदाज ठरला आहे. म्हणजे तब्बल सलग सातव्यांदा त्याने भारताकडून वनडेत वर्षातील सर्वोच्च धावांची खेळी करण्याचा विक्रम केला आहे.

आजच्या सामन्यात रोहितसह सलामीवीर फलंदाज केएल राहुलनेही शतकी खेळी करताना 102 धावा केल्या आहेत. तसेच श्रेयस अय्यरने 53 धावांची खेळी केली तर रिषभ पंतने 39 धावांची छोटेखानी खेळी केली. त्यामुळे भारताने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 5 बाद 387 धावा केल्या आहेत.

वनडेत 2013 पासून भारताकडून एका वर्षात सर्वोच्च धावांची वैयक्तिक खेळी करणारे क्रिकेटपटू – 

2013 –  रोहित शर्मा (209)

2014 –  रोहित शर्मा (264)

2015 –  रोहित शर्मा (150)

2016 –  रोहित शर्मा (271)

2017 –  रोहित शर्मा (208*)

2018 –  रोहित शर्मा (162)

2019 –  रोहित शर्मा (159)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---