बांगलादेश विरुद्ध भारत (BANvIND) यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. यातील पहिला सामना 14 डिसेंबरपासून चट्टोग्राम येथे सुरू आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करताना 404 धावसंख्या उभारली. दुसऱ्या डावातही भारताच्या फलंदाजांनी उत्तम कामगिरी केली. ज्यामध्ये शुबमन गिल आणि चेतेश्वर पुजारा यांनी शतकी खेळी केल्या. यजमानांचा पहिला डाव 150 धावसंख्येवर गंडला असला तरी दुसऱ्या डावात त्यांनी उत्तम फलंदाजी करत विक्रम रचला आहे.
बांगलादेशची सलामी जोडी नजमुल हुसेन शांतो ( Najmul Hossain Shanto) आणि झाकीर हसन (Zakir Hasan) यांनी शतकी भागीदारी करत संघाचा धावफलक हलता ठेवला. यामुळे भारताच्या चिंतेत वाढ होताना दिसली, त्याचक्षणी उमेश यादवने शांतोचा अडसर दूर केला. तो 156 चेंडूत 67 धावा करत तंबूत परतला. बाद होण्याआधी त्याने हसनसोबत पहिल्या विकेटसाठी 124 धावांची भागीदारी केली. जी बांगलादेशकडून भारताविरुद्धची कसोटीतील सर्वोच्च सलामीची भागीदारी ठरली.
शांतो-हसन जोडीने 277 चेंडूत 124 धावांची भागीदारी केली. त्याआधी 2010मध्ये इमरुल कायस आणि तमीम इक्बाल यांनी सलामीची मोठी भागीदारी केली होती, जी 53 धावांची होती.
बांगलादेशच्या दुसऱ्या डावात शांतो बाद झाल्यानंतर तीन षटकातच अक्षर पटेल याने यासीर अली याला त्रिफळाचीत केल्याने थोडे संकट टळले, मात्र हसन 81 धावा करत खेळपट्टीवर असून त्याला दुसऱ्या बाजूने लिटन दास याची उत्तम साथ मिळत आहे. या दोघांनी तिसऱ्या विकेट्साठी आतापर्यंत नाबाद 38 धावांची भागीदारी केली आहे. यामुळे भारताचा कर्णधार केएल राहुल याने डाव घोषित करण्यात घाई केली का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
हा सामना जिंकण्यासाठी बांगलादेशला 513 धावा करायच्या आहेत. आयसीसी कसोटी अजिंक्यपद 2021-23च्या अंतिम सामन्यासाठी भारताला कसेही करून हा सामना जिंकणे आवश्यक आहे. Highest opening partnership for Bangladesh against India in Tests ban v ind first test 2022
बांगलादेशची भारताविरुद्ध कसोटीत सर्वोच्च सलामीची भागीदारी-
124 – नजमुल हुसेन शांतो आणि झाकीर हसन (2022)
53 – इमरुल कायस आणि तमीम इक्बाल (2010)
48 – जावेद उमर आणि नफीस इक्बाल (2004)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पहिल्या कसोटी शतकाला शुबमन गिलने म्हटले खास, मात्र एका गोष्टीमुळे ‘नाराज’
FIFA WC 2022: अर्जेंटिनाशी भिडण्यापूर्वीच फ्रांसला मोठा धक्का, अनेक स्टार खेळाडू व्हायरसच्या विळख्यात