इंडियन प्रीमिअर लीग २०२२मधील १५वा सामना गुरुवारी (०७ एप्रिल) लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात पार पडला. हा सामना मुंबईच्या डॉ. डी. वाय. पाटील क्रिकेट अकादमी येथे खेळण्यात आला. या सामन्यात लखनऊ संघाने नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. यावेळी फलंदाजीला आलेल्या दिल्ली संघाच्या फलंदाजांनी पावरप्लेमध्ये तुफान फटकेबाजी केली. सलामीवीर पृथ्वी शॉने पावरप्लेमध्ये केलेल्या फटकेबाजीमुळे त्याच्या नावावर एका खास विक्रमाची नोंद झालीये.
नाणेफेक जिंकत लखनऊचा (Lucknow Super Giants) कर्णधार केएल राहुलने (KL Rahul) क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेत दिल्लीला (Delhi Capitals) फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. यावेळी दिल्लीकडून सलामीला पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) आणि डेविड वॉर्नर (David Warner) फलंदाजी करत होते. शॉने सुरुवातीपासूनच फटकेबाजी केली. त्याने पावरप्लेमध्ये फलंदाजी करताना २७ चेंडूत ताबडतोब ४७ धावांचा पाऊस पाडला. या खेळीमुळे तो आयपीएल २०२२मध्ये पावरप्लेमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अव्वलस्थानी पोहोचला आहे.
शॉपूर्वी चेन्नई सुपर किंग्जचा फलंदाज रॉबिन उथप्पाने लखनऊविरुद्धच्याच सामन्यात खेळताना पावरप्लेमध्ये ४५ धावा ठोकल्या होत्या. त्याच्याव्यतिरिक्त राजस्थान रॉयल्स संघाचा विस्फोटक फलंदाज जोस बटलरनेही अशीच कामगिरी केली होती. त्याने मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळताना पावरप्लेमध्ये ४० धावा कुटल्या होत्या.
6️⃣1️⃣ off 3️⃣4️⃣ 🔥
9️⃣ fours 💥
2️⃣ sixes 🙌🏼We just witnessed the Shaw-stopper at his belligerent best 🤩#YehHaiNayiDilli | #IPL2022 | #LSGvDC | @PrithviShaw#TATAIPL | #IPL | #DelhiCapitals pic.twitter.com/U5QaG97WXi
— Delhi Capitals (@DelhiCapitals) April 7, 2022
पृथ्वी शॉच्या या सामन्यातील कामगिरीविषयी बोलायचं झालं, तर त्याने ३४ चेंडूत ६१ धावांची वादळी खेळी केली. या धावा करताना त्याने २ षटकार आणि ९ चौकार ठोकल्या. शॉच्या एकूण आयपीएल कारकीर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने आयपीएलमध्ये एकूण ५६ सामन्यात फलंदाजी करताना २५.२५च्या सरासरीने १४१४ धावा केल्या आहेत. या धावा करताना ११ अर्धशतके ठोकली आहेत.
आयपीएल २०२२मध्ये पावरप्लेमध्ये सर्वाधिक धावा करणारे खेळाडू
४७ धावा- पृथ्वी शॉ (विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स)
४५ धावा- रॉबिन उथप्पा (विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स)
४० धावा- जोस बटलर (विरुद्ध मुंबई इंडियन्स)
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
पदार्पणाच्या सामन्यातच ‘बेबी एबी’ने ठोकला गगनचुंबी ‘नो लूक सिक्स’, व्हिडिओ पाहून तुम्हीही कराल कौतुक
MI vs KKR | ‘ती’ एक ओव्हर मुंबईचे फॅन्स आणि डॅनियल सॅम्स आयुष्यभर नाही विसरणार
‘माही भाई नाही, तर मग काय’, उथप्पाच्या पेचावर धोनीनेच दिलं उत्तर; मैत्रीचाही खास किस्सा झाला उघड