---Advertisement---

चॅम्पियन ऑस्ट्रेलियाविरुद्ध राशिद खानचा कहर, टी20 विश्वचषकातील ‘हा’ बलाढ्य रेकॉर्ड केला नावावर

Rashid Khan
---Advertisement---

आठव्या टी20 विश्वचषकात शुक्रवारी (4 नोव्हेंबर) न्यूझीलंड उपांत्य फेरीत दाखल झाला, तर यजमान आणि गतविजेत्या ऑस्ट्रेलियाच्या आशा संपुष्टात आल्याचे दिसले. ऑस्ट्रेलियाने या स्पर्धेतील सुपर 12चा 38वा सामना अफगाणिस्तानविरुद्ध खेळला. हा सामना ऑस्ट्रेलियाने केवळ 4 धावांनी जिंकला. या स्पर्धेत आपले आव्हान कायम राखण्यासाठी त्यांना मोठ्या फरकाने जिंकणे आवश्यक होते. आता त्यांना उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी दुसऱ्या संघांच्या निकालावर अवलंबून राहावे लागणार आहे. त्यांचा हा स्वप्नभंग राशिद खान याने केला. त्याचबरोबर राशिदने त्याच्या नावावर टी20 विश्वचषकाच्या इतिहासात नव्या विक्रमाची नोंदही केली.

ऍडलेडच्या ओव्हलवर लक्ष्याचा पाठलाग करताना अफगाणिस्तानने 14.3 षटकात 103 धावसंख्येवर 6 विकेट्स गमावल्या. त्यानंतर राशिद खान (Rashid Khan) आठव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. त्याने ज्याप्रकारे स्फोटक फलंदाजी केली त्यावरून अफगाणिस्तान जिंकणार की काय अशी शंका आली, मात्र संघ हरला. तर राशिदच्या नावावर टी20 विश्वचषकाच्या इतिहासातील मोठ्या विक्रमाची नोंद झाली. त्याने या सामन्यात नाबाद 48 धावा केल्या. त्याचबरोबर तो टी20 विश्वचषकात आठव्या किंवा त्याही खालच्या क्रमांकावर फलंदाजी करताना सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमवीर ठरला.

टी20 विश्वचषकात आठव्या किंवा त्याही खालच्या क्रमांकावर फलंदाजी करताना सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम राशिदच्या आधी पापुआ न्यू गिनीच्या किपलिन डोरिगा याच्या नावावर होता. त्याने 2021मध्ये बांगलादेशविरुद्ध आठव्या क्रमांकावर फलंदाजी करताना नाबाद 46 धावा केल्या होत्या. या यादीत तिसऱ्या स्थानावर अफगाणिस्तानचा गुलबदिन नायब आहे. त्यानेही 2012मध्ये आठव्या क्रमांकावर फलंदाजी करताना इंग्लंडविरुद्ध 44 धावा केल्या होत्या. Highest score at tailend position (no.8/lower) in T20 World Cup

ऑस्ट्रेलियाच्या सामन्यात अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकला आणि ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजी करण्याचे आव्हान दिले. ग्लेन मॅक्सवेल याच्या नाबाद 54 आणि मिशेल मार्श याच्या 45 धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने 20 षटकात 8 विकेट्स गमावत 168 धावसंख्या उभारली. लक्ष्याचा पाठलाग करताना अफगाणिस्तानची सुरूवात निराशाजनक झाली. त्यांचा सलामीवीर उस्मान घणी 2 धावा करत बाद झाला. गुलबदिन नायब आणि इब्राहिम झाद्रान यांनी तिसऱ्या विकेटसाठी 59 धावांची भागीदारी केली. नायब 39 धावा करत धावबाद झाला. त्यानंतर राशिदने स्फोटक खेळी केली, मात्र दुसऱ्या बाजूने त्याला हवी तशी साथ मिळाली नाही. यामुळे अफगाणिस्तानचा संघ 20 षटकात 7 विकेट्स गमावत 164 धावांपर्यंतच मजल मारू लागला.

टी20 विश्वचषकात आठव्या किंवा त्याही खालच्या क्रमांकावर फलंदाजी करताना सर्वाधिक धावा करणारे-
48* – राशिद खान वि. ऑस्ट्रेलिया, 2022

46* – किपलिन डोरिगा वि. बांगलादेश, 2021
44  – गुलबदिन नायब वि. इंग्लंड, 2012
35* – अँजेलो मॅथ्यूज वि. पाकिस्तान, 2009
35* – शफीकुल्ला शफीक वि. इंग्लंड, 2016
35* – गुलबदिन नायब वि. पाकिस्तान 2021

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
शार्दुलने धोनीबद्दल केला मोठा खुलासा; जे काही म्हणाला, त्याने ‘माही’वरील तुमचंही प्रेम आणखी वाढेल
बार्सिलोनाच्या जेरार्ड पिकची अचानक निवृत्तीची घोषणा; दिला 14 वर्षाच्या कारकिर्दीला पूर्णविराम

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---