इंग्लंड विरुद्ध बांगलादेश संघात विश्वचषक 2023 स्पर्धेचा 7वा सामना धरमशाला येथे रंगला. या सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशविरुद्ध 50 षटकात 9 विकेट्स गमावत 364 धावांचा डोंगर उभारला. इंग्लंडकडून या धावा करताना डेविड मलान याने सर्वाधिक धावा केल्या. त्याच्या या खेळीमुळेच त्याच्या नावावर विश्वचषकातील सर्वाधिक धावा करण्याचा खास विक्रम नोंदवला गेला.
मलानचा विक्रम
झाले असे की, या सामन्यात डेविड मलान (Dawid Malan) याने सावकाश सुरुवात केली होती. मात्र, 5व्या षटकानंतर त्याने आपला गिअर बदलत बांगलादेशची गोलंदाजी फोडून काढली. त्याने 39 चेंडूत आधी अर्धशतक झळाकवले. तसेच, त्यानंतर 91 चेंडूत शतक साजरे केले. हे त्याचे वनडे कारकीर्दीतील सहावे शतक ठरले. तसेच, या विश्वचषकातील त्याचे पहिले शतक होते. यादरम्यान त्याने 12 चौकार आणि 2 षटकारही ठोकले. त्याने या सामन्यात एकूण 107 चेंडूंचा सामना केला. यादरम्यान त्याने 5 षटकार आणि 16 चौकारांच्या मदतीने 140 धावांची सर्वोच्च खेळी केली. यामुळे त्याच्या नावावर खास विक्रम नोंदवला गेला.
विश्वचषकातील इंग्लंडसाठीची चौथी सर्वोच्च धावसंख्या
मलान याने केलेली ही खेळी इंग्लंडसाठी विश्वचषकातील चौथी सर्वोच्च खेळी ठरली. इंग्लंडसाठी विश्वचषकात सर्वोच्च धावसंख्या उभारण्याचा विक्रम अँड्र्यू ट्रॉस याच्या नावावर आहे. त्याने 2011च्या विश्वचषकात भारताविरुद्ध 158 धावांची सर्वोच्च खेळी साकारली होती. त्यानंतर यादीत दुसऱ्या स्थानी जेसन रॉय असून त्याने विश्वचषकात इंग्लंडसाठी 153 धावांची सर्वोच्च धावसंख्या उभारली होती. तसेच, यादीत तिसऱ्या स्थानी असलेल्या ऑयन मॉर्गन याने 148 धावांची जबरदस्त खेळी केली होती.
Highest Score for England in Worldcup
158 – Andrew Strauss (2011)
153 – Jason Roy (2019)
148 – Eoin Morgan (2019)
140 – Dawid Malan (Today)#ICCCricketWorldCup— CricBeat (@Cric_beat) October 10, 2023
इंग्लंडसाठी विश्वचषकात सर्वोच्च धावसंख्या करणारे फलंदाज
158- अँड्र्यू ट्रॉस (2011)
153- जेसन रॉय (2019)
148- ऑयन मॉर्गन (2019)
140- डेविड मलान (2023)*
इंग्लंडचा डाव
इंग्लंडकडून या सामन्यात मलानव्यतिरिक्त (140) जो रूट आणि जॉनी बेअरस्टो यांनीही अर्धशतक झळकावले. रूटने 68 चेंडूत 82 धावा, तर बेअरस्टोने 59 चेंडूत 52 धावांची अर्धशतकी खेळी साकारली. याव्यतिरिक्त एकही खेळाडू 20 धावांचा आकडा पार करू शकला नाही. अशाप्रकारे इंग्लंडने 9 विकेट्स गमावत 364 धावा केल्या.
यावेळी बांगलादेशकडून गोलंदाजी करताना महेदी हसन याने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. महेदीने 8 षटकात 71 धावा खर्चत 4 विकेट्स घेतल्या. त्याच्याव्यतिरिक्त शोरीफुल इस्लाम याने 3 विकेट्स, तर तस्कीन अहमद आणि शाकिब अल हसन यांनी प्रत्येकी 1 विकेट नावावर केली. (Highest Score for England in ICC World cup dawid malan)
हेही वाचा-
रूटने घडवला इतिहास, विश्वचषकात ‘असा’ विक्रम करत बनला इंग्लंडचा पहिलाच फलंदाज; वाचाच
बांगलादेशविरुद्ध मलानची तोडफोड फलंदाजी! ठोकले विश्वचषकातील आपले पहिले-वहिले शतक