---Advertisement---

यजुवेंद्र चहलच्या घरी कोरोनाचा शिरकाव! आई अन् वडील दोघेही कोव्हिड पॉझिटिव्ह, ‘या’ नातेवाईकांचे झाले निधन

On: गुरूवार, मे 13, 2021 10:52 PM
---Advertisement---

भारतीय संघाचा फिरकीपटू युजवेंद्र चहल आणि त्याचे कुटुंब सध्या कठीण अवस्थेतून जात आहे. चहलच्या पालकांना कोरोनाची लागण झाली आहे. वडिलांची प्रकृती चिंताजनक झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चहलची पत्नी धनश्रीने ही माहिती दिली आहे.

धनश्रीने इंस्टाग्रामद्वारे ही माहिती दिली आहे. तिने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिले, “एप्रिल आणि मे महिना आमच्यासाठी खूपच कठीण होता. हे एक भावनिक आव्हानासारखे आहे. प्रथम माझा भाऊ आणि आई कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. त्यावेळी मी आयपीएलच्या बबलमध्ये होते. त्यावेळी मला स्वत: ला असहाय्य वाटत होते, पण वेळोवेळी त्यांच्या प्रकृतीविषयी विचारणा करत होते. कुटुंबापासून दूर राहणे खरोखर कठीण आहे. ते या आजाराने बरे झाले, पण माझ्या एक काकू आणि जवळच्या व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ”

Photo Courtesy: Instagram/@dhanashree9

धनश्रीने पुढे लिहिले, “आता माझी सासू आणि सासरे गंभीर लक्षणांसह कोरोना पॉझिटिव्ह आहेत. सासऱ्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले असून सासूवर घरी उपचार सुरू आहेत. मी दवाखान्यात होते आणि सर्व प्रकारची खबरदारी घेत आहे. तुम्ही सर्व घरीच रहा. जर तुम्ही अशा कोणत्याही रुग्णाला ओळखत असाल तर त्याला नक्की मदत करा.” दरम्यान, ही बातमी सोशल मीडियात पसरल्यानंतर अनेकांनी चहलच्या कुटुंबियांसाठी प्रार्थना केलेल्या आहेत.

Photo Courtesy: Instagram/@dhanashree9

दरम्यान भारतीय खेळाडूंच्या कुटुंबियांना कोरोना होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही.यापूर्वी माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या पालकांना कोरोना झालेला होता. तसेच दुःखद बाब म्हणजे आरपी सिंग, चेतन सकारिया व पियूष चावला या तीन खेळाडूंच्या वडिलांचे कोरोना मुळे निधन झालेले आहे. भारतात सध्या कोरोनाचा तीव्र उद्रेक सुरू असून, खेळाडूंना बायोबबलमध्ये देखील कोरोना होत असल्यामुळे आयपीएल 2021 स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आलेली आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

धोनीचे पदार्पण होण्याच्या १५ वर्षांपूर्वीच ‘या’ भारतीय खेळाडूने खेळला होता हेलिकॉप्टर शॉट, बघा व्हिडिओ

‘या’ प्रमुख ३ कारणांमुळे भुवनेश्वर कुमारकडे श्रीलंका दौऱ्यात द्यायला हवे टीम इंडियाचे कर्णधारपद

इरफान पठाणने कंगणा राणावतला घेतले फैलावर, केले ‘असे’ ट्विट

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---