आयपीएल 2023 मध्ये मंगळवारी (16 मे) अत्यंत महत्त्वाचा सामना खेळला जाणार आहे. प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी लढत असलेल्या लखनऊ सुपरजायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्या दरम्यान हा सामना होईल. या सामन्यासाठी मुंबईचा संघ लखनऊ येथे रविवारी पोहोचला. त्यानंतर सोमवारी संघाचा सराव पार पडला. या सरावात मुंबईचा युवा अष्टपैलू अर्जुन तेंडुलकर याने देखील भाग घेतला. यादरम्यान त्याने आपल्याला श्वानाने चावले असल्याचा धक्कादायक खुलासा केला.
मागील तीन वर्षांपासून मुंबई इंडियन्सचा भाग असलेला अर्जुन या वर्षी प्रथमच आयपीएलमध्ये खेळताना दिसला आहे. लखनऊविरुद्धच्या सामन्यात त्याला संधी मिळते का हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. मात्र, त्याचवेळी त्याने सरावात उतरताना आपल्या बाबत एक महत्त्वाची माहिती दिली. सराव सत्रात भाग घेण्यासाठी आल्यानंतर त्याने लखनऊचा वेगवान गोलंदाज युद्धवीर चरक याची भेट घेतली. त्यावेळी त्याने आपल्या हाताकडे इशारा करत म्हटले, माझ्या हाताला श्वानाने चावले आहे. त्यावेळी चरक याने कधी असे विचारले असता, त्याने काल घडल्याचे सांगितले. यानंतर त्याने मोहसीन खान याची देखील भेट घेतली.
https://www.instagram.com/reel/CsRHNpyBIKg/?igshid=NTc4MTIwNjQ2YQ==
अर्जुन तेंडुलकर याने या हंगामात आतापर्यंत चार सामने खेळले आहेत. यामध्ये तीन बळी घेण्यात त्याला यश आले आहे. मात्र, तो चांगलाच महागडा ठरल्याने त्याला नंतर संधी मिळाली नाही.
उभय संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
मुंबई इंडियन्स
रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), कॅमरून ग्रीन, सूर्यकुमार यादव, टीम डेव्हिड, नेहल वढेरा, रायली मेरेडिथ, पीयूष चावला, आकाश मधवाल, कुमार कार्तिकेय, जेसन बेहरेनडॉर्फ.
लखनऊ सुपरजायंट्स: क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), कायले मेयर्स, कृणाल पांड्या (कर्णधार), प्रेरक मंकड, मार्कस स्टॉइनिस, निकोलस पूरन, अमित मिश्रा, यश ठाकूर, रवी बिश्नोई, युधवीर सिंग चरक, आवेश खान.
(Hilarious Dog Biting Arjun Tendulkar Before Match Against Lucknow Supergiants)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
गुजरातचा विजयरथ सलग दुसऱ्या हंगामात सुसाट! पुन्हा चालली हार्दिक-नेहराजींची जादू
शमीचा ‘पर्पल पॅच’ सुरूच! सनरायझर्सला लोळवत पुन्हा बनलाय नंबर वन






