दिल्ली। इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामातील २४ वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात पार पडला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने ७ विकेट्सने विजय मिळवला. या सामन्यात मुंबईचा अष्टपैलू क्रिकेटपटू पोलार्डबाबतीत एक गमतीशीर घटना पाहायला मिळाली. त्याच्या हेल्मेटला लागून चेंडू चक्क सीमापार गेला, या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
चेंडूने ऐकले पोलार्डचे
झाले असे की या सामन्यात राजस्थानने मुंबईसमोर १७२ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईकडून पोलार्ड फलंदाजी करत होता, तेव्हा १८ व्या षटकात ख्रिस मॉरीसने तिसरा चेंडू आखुड टप्प्याचा टाकला. त्यावर पोलार्डने चेंडूपासून वाचण्यासाठी खाली बसण्याचा प्रयत्न केला. मात्र, चेंडू त्याच्या हेल्मेटवर आदळून फाईन लेगच्या दिशेने जात सीमापार गेला. त्यामुळे मुंबई इंडियन्सला चार धावा मिळाल्या.
यादरम्यान पोलार्ड गमतीशीर कृती करतानाही दिसला. ज्यावेळी चेंडू त्याच्या हेल्मेटला आदळून सीमारेषेच्या दिशेने जात होता, तेव्हा पोलार्ड गमतीने हातवारे करत चेंडूला चौकारासाठी जाण्यास सांगत होता. अखेर तो चेंडू चौकार गेल्यावर पोलार्डच्या चेहऱ्यावर हास्य पसरले. मात्र हे पाहून गोलंदाजी करत अलेल्या मॉरिसच्या चेहऱ्याचा रंग उडाला. तो तोंडावर ठेवत थक्क होऊन पोलार्डकडे पाहात राहिला.
असे असले तरी चेंडू पोलार्डच्या हेल्मेटला लागल्याने त्याला कन्कशन टेस्ट करावी लागली. पण काही गंभीर नसल्याने तो पुढे खेळला.
https://twitter.com/lodulalit001/status/1387766411607609347
या घटनेबद्दल ट्विटरवर अनेक गमतीशीर प्रतिक्रिया आल्या आहेत. एका चाहत्याने ट्विट केले आहे की ‘पोलार्डच्या हेल्मेटनेही चौकार जातो.’ तर दुसऱ्या एका चाहत्याने ट्विट केले आहे की ‘पोलार्ड आयपीएलमध्ये मनोरंजन करणाऱ्या खेळाडूंपैकी एक आहे. त्याच्या कृती आनंद देणाऱ्या असतात.’
Pollard = Entertainment (anytime) ????
Show me a batsman who can do this
Po(LORD) ????????????????♂️Morris be like WTF just happened here#MiTheEmperorOfIPL pic.twitter.com/cb3zchk9k7
— Vasanth Kumar (@Always_RO45) April 29, 2021
https://twitter.com/aditya_dasari10/status/1387761567622701058
https://twitter.com/bhandar01454520/status/1387764781927518216
https://twitter.com/ribas30704098/status/1387768216357900289
Never short of entertainment with Pollard at the crease ????
— Mumbai Indians (@mipaltan) April 29, 2021
https://twitter.com/Yorker_Gawd/status/1387761564191756288
मुंबईने मिळवला विजय
या सामन्यात राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ४ बाद १७१ धावा केल्या. राजस्थानच्या फलंदाजांकडून सांघिक कामगिरी पाहायला मिळाली. राजस्थानकडून सलामीवीर जोस बटलर आणि यशस्वी जैयस्वालने ६६ धावांची भागीदारी रचली. बटलर ४१ धावांवर तर जयस्वाल ३२ धावा करुन बाद झाले.
त्यानंतर संजू सॅमसन आणि शिवम दुबेने ५७ धावांची भागीदारी केली. संजू सॅमसन ४२ धावांवर तर दुबे ३५ धावांवर बाद झाला. अखेर डेव्हिड मिलर आणि रियान परागने राजस्थानला १७१ धावांपर्यंत पोहचवले. मिलर ७ धावांवर आणि पराग ८ धावांवर नाबाद राहिले.
मुंबईकडून राहुल चाहरने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या. तसेच जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्टने प्रत्येकी १ विकेट घेतली.
प्रतिउत्तरादाखल, १७२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग मुंबई इंडियन्सने १८.३ षटकात ३ विकेट्स गमावत सहज पूर्ण केला. मुंबईकडून क्विंटन डी कॉकने ५० चेंडूत नाबाद ७० धावांची अर्धशतकी खेळी केली. तसेच कृणाल पंड्यासह ६३ धावांची महत्त्वाची भागीदारी केली. पंड्याने ३९ धावा केल्या. त्याचबरोबर रोहित शर्माने १४, सुर्यकुमार यादवने १६ आणि कायरन पोलार्डने नाबाद १६ धावांचे योगदान दिले.
राजस्थानकडून ख्रिस मॉरिसने २ विकेट्स घेतल्या, तर मुस्तफिजूर रेहमानने १ विकेट घेतली.
महत्त्वाच्या बातम्या –
पहिल्याच षटकात ६ चौकार मारणाऱ्या पृथ्वी शॉचे सामन्यानंतर शिवम मावीने धरले मानगूट, पाहा व्हिडिओ
पृथ्वी शॉच्या पहिल्याच षटकातील ६ चौकारांमुळे शिवम मावीच्या नावावर झाला ‘हा’ नकोसा विक्रम
पृथ्वी शॉचा मोठा कारनामा! केवळ १८ चेंडूत अर्धशतक झळकावत केला ‘हा’ रेकॉर्ड




