---Advertisement---

भारतीय महिला संघाचा पराक्रम; टी20 मध्ये रचला इतिहास

On: रविवार, जून 29, 2025 12:58 PM
---Advertisement---

भारतीय महिला संघाने पहिल्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात इंग्लंडचा 97 धावांनी पराभव केला. या सामन्यात भारताच्या गोलंदाजांनी आणि फलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. स्मृती मानधना भारतासाठी सामनावीर ठरली, तिने शतक झळकावून संघाला विजय मिळवून दिला. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 210 धावा केल्या, ज्याच्या प्रत्युत्तरात इंग्लंड महिला संघाला फक्त 133 धावा करता आल्या. टी-20 क्रिकेटमध्ये भारतीय महिला संघाचा हा चौथा सर्वात मोठा विजय आहे.

भारतीय महिला संघाने 200 पेक्षा जास्त धावा करून इतिहास रचला आहे. भारतीय संघ महिला टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलग दोन टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 200 पेक्षा जास्त धावा करणारा पहिला पूर्ण सदस्य संघ बनला आहे. मागील सामन्यात भारतीय महिला संघाने वेस्ट इंडिजविरुद्ध 217 धावा केल्या. इंडोनेशिया आणि अर्जेंटिना या संघांनीही महिला टी-20 क्रिकेटच्या सलग दोन सामन्यांमध्ये 200 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. पण हे दोन्ही पूर्ण सदस्य संघ नाहीत.

इंग्लंडची कर्णधार नॅट सेव्हियर ब्रंटने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर भारताकडून स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा यांनी आक्रमक फलंदाजी केली. या दोघींनी सलामी देताना शानदार फलंदाजी केली आणि इंग्लंडच्या गोलंदाजांना एकही संधी दिली नाही. पहिल्या विकेटसाठी दोघांध्ये 77 धावांची भागीदारी झाली आणि यामुळे मोठ्या धावसंख्येचा पाया रचला गेला. शेफाली आपला डाव लांबवू शकली नाही आणि ती 22 धावा करून बाद झाली.

यानंतर तिसऱ्या क्रमांकावर हरलीन देओल फलंदाजीसाठी आली. तिने 23 चेंडूत 43 धावा केल्या, ज्यामध्ये 7 चौकारांचा समावेश होता. दुसरीकडे, कर्णधार स्मृती मानधनाने 62 चेंडूत 15 चौकार आणि तीन षटकारांसह 112 धावा केल्या. स्मृतीच्या खेळीमुळेच भारतीय संघ 210 धावांचा मोठा धावसंख्या उभारण्यात यशस्वी झाला.

इंग्लंड महिला संघाकडून नेट सेव्हियर ब्रंटने 66 धावा केल्या. तिला इतर फलंदाजांकडून साथ मिळाली नाही. सामन्यात संघासाठी दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या 12 धावा होती, जी एम आर्लॉटने केली. एन चरणीने भारताकडून पदार्पण केले आणि चार विकेट्स घेतल्या. तिच्याशिवाय दीप्ती शर्मा आणि राधा यादवने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. या गोलंदाजांमुळे संपूर्ण इंग्लंड संघ फक्त 113 धावांवर आटोपला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---