बुधवारपासून पाकिस्तान आणि श्रीलंकेच्या भूमीवर आशिया चषक 2023 ला सुरुवात झाली आहे. आशिया चषकमच्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तान संघाने नेपाळ संघाविरुद्ध 238 धावंनी दणदणीत विजय मिळवला. आता गुरुवारी श्रीलंकेचा सामना बांगलादेश सोबत होणार आहे. गेल्या काही वर्षांत श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यातील सामने नागिन डान्समुळे चर्चेत आले आहेत. आशिया चषकादरम्यानही जेव्हा हे दोन संघ एकमेकांशी भिडतात तेव्हा मैदानावर नागिनचा डान्स पाहायला मिळतो. मात्र, या दोघांमध्ये नागिन डान्सची लढाई कशी सुरू झाली जाणून घ्या.
क्रिकइन्फोच्या रिपोर्टनुसार, नागिन डान्सची एंट्री बांगलादेश प्रीमियर लीगमधून झाली आहे. वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार डॅरेन शमीने बांगलादेशचा फिरकी गोलंदाज नजमुल इस्लामला सांगितले की, तो सापासारखा आहे. यानंतर नजमुलने प्रत्येक वेळी विकेट घेताना नागिन डान्स करायला सुरुवात केली.
श्रीलंका संघ बांगलादेशच्या दौऱ्यावर 2018 मध्ये गेला होता. त्यावेळी विकेट घेतल्यानंतर नजमुलने नागिन स्टाईलमध्ये सेलिब्रेशन केले. नंतर श्रीलंकेच्या खेळाडूने नजमुलची खिल्ली उडवत त्याच शैलीची कॉपी केली. बांगलादेशचा स्टार खेळाडू रहीमला ही गोष्ट आवडली नाही आणि निबास ट्रॉफीचा सामना जिंकल्यानंतर बांगलादेशच्या सगळ्याच खेळाडूंनी नागिन डान्स करत श्रीलंकन खेळाडूंना चिडवले होते.
इथूनच नागिन डान्सबाबत बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यातील वैर सुरू झाले. जो संघ सामना जिंकेल तो नाग डान्स सुरू करायचा. दोन्ही संघांचे चाहतेही तेच करू लागले. नागिन डान्सवरून दोन्ही देशांचे खेळाडू आणि चाहत्यांमध्ये अनेकदा मारामारी पाहायला मिळाली. मात्र, हा उत्सव आता बांगलादेश आणि श्रीलंकेच्या प्रत्येक सामन्याचा एक भाग बनला आहे. आशिया चषकादरम्यान दोन्ही देशांच्या खेळाडूंमध्ये नागिन डान्सचा जल्लोष पाहायला मिळणे स्वाभाविक आहे.
गुरवारी रंगणार श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात सामना
आशिया चषकाचा दुसरा सामना गुरवारी बांगलादेश आणि श्रीलंका या संघात होणार आहे. अशात या दोन संघात कोणा बाजी मारून नागिन डान्स करणार हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे. (history of bangaladesh vs sri lanka naagin dance)
महत्वाच्या बातम्या-
बाबर-विराटच्या पहिल्या भेटीत काय घडलेल? पाकिस्तानी कर्णधारानेच केला खुलासा
दुखापतग्रस्त असलेल्या खेळाडूंबाबत श्रीलंकन कर्णधाराचे वक्तव्य, म्हणाला आम्हच्याकडे युव खेळाडू…