क्रिकेट जगतात आतापर्यंत आपण क्षेत्ररक्षकांनी चेंडू फेकून (थ्रो) फलंदाजांना धावबाद केल्याचे पाहिले आहे. परंतु पायाने चेंडू मारून फलंदाजाला धावबाद केल्याचे क्वचितच पाहिले असेल. असेच काहीसे बिग बॅश लीगमध्ये पाहायला मिळाले. बीबीएल २०२० मधील ५ वा सामना होबार्ट हरीकेन्स आणि ऍडलेड स्ट्रायकर्समध्ये झाला. हा सामना होबार्टला ११ धावांनी पराभूत केले. यामध्ये होबार्टचा गोलंदाज रिले मेरेडिथच्या शानदार क्षेत्ररक्षणाचा नजारा पाहायला मिळाले. त्याने आपल्या क्षेत्ररक्षणाने सर्वांची मने जिंकली.
झाले असे की, ऍडलेड स्ट्रायकर्सच्या डावातील ९वे षटक टाकण्यासाठी होबार्टचा गोलंदाज मेरेडिथ आला होता. आणि स्ट्रायकर्सकडून हॅरी नील्सन फलंदाजी करत होता. या षटकातील तिसऱ्या चेंडूवर फलंदाज नील्सनने लेग साईडला शॉट मारण्याचा प्रयत्न केला, परंतु तो शॉट त्याला मारता आला नाही आणि चेंडू त्याच्या पॅडला लागून स्टंपच्या पुढेच पडला.
यादरम्यान नॉन- स्ट्राईकवर उभा असलेला रायन गिब्सन धाव घेण्यासाठी धावला. आणि त्याच्यासोबतच गोलंदाज मेरेडिथही वेगाने धावला आणि चेंडूजवळ लवकर जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याने चेंडूजवळ पोहोचत चपळता दाखवली आणि चेंडू हाताने पकडण्याऐवजी किक मारत चेंडू स्टंपच्या दिशेने मारला.
गोलंदाज मेरेडिथने पायाने मारलेला चेंडू स्टंपवर लागला आणि रायन धावबाद झाला. यादरम्यानचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. रायनला या सामन्यात केवळ ७ धावा करता आल्या.
Incredible! That moustache has super powers. Riley Meredith is doing it all out there! #BBL10 pic.twitter.com/I6ccaj2QQ7
— KFC Big Bash League (@BBL) December 13, 2020
होबार्टने प्रथम फलंदाजी करत ५ विकेट्स गमावत १७४ धावा केल्या होत्या. या धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना स्ट्रायकर्स संघाला ९ विकेट्स गमावत १६३ धावाच करता आल्या.
होबार्टच्या डॉर्सी शॉर्टने या सामन्यात राशिद खानविरुद्ध आक्रमक फलंदाजी करत एकाच षटकात २४ धावा कुटल्या. यामध्ये १ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. त्याने या सामन्यात ४८ चेंडूत ७२ धावांची अर्धशतकी खेळी केली. यामध्ये ४ षटकार आणि ६ चौकारांचा समावेश होता. शॉर्टला या सामन्यात सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
महत्त्वाच्या बातम्या-
साहा आणि पंतमध्ये कोण असावा पहिल्या कसोटीत यष्टीरक्षक?, माजी दिग्गजाची ‘या’ खेळाडूला पसंती