पुणे, 12 मार्च 2024: 14व्या हॉकी इंडिया सीनियर महिला राष्ट्रीय अजिंक्यपद 2024 स्पर्धेच्या ब गटातील सलामीच्या सामन्यात बुधवारी गेल्या आवृत्तीचे उपविजेता हॉकी महाराष्ट्र संघ केरळ हॉकी संघाशी दोन हात करेल. घरच्या मैदानावर खेळताना यजमान संघाने विजयाने सुरुवात करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
स्पर्धेचे आयोजक असलेला हॉकी महाराष्ट्र प्रकाशझोतात (सायंकाळी 7 वाजता) मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम, नेहरूनगर, पिंपरी येथे सलामीचा सामना खेळेल. या सामन्यात प्रेक्षक गॅलरी खचाखच भरण्याची अपेक्षा आहे.
दोन्ही संघांचे बलाबल पाहता, स्पर्धेला अधिकृतपणे सुरुवात करणार्या या लढतीत यजमान हॉकी महाराष्ट्राचे पारडे जड आहे. त्याची तशी कारणेही आहेत. होमग्राउंडवर खेळण्याचा मोठा फायदा त्यांना होईल. शिवाय, वैष्णवी फाळके यांच्या नेतृत्वाखालील यजमान संघात अक्षता ढेकळे, ऋजुता पिसाळ आणि गोलकीपर रजनी एटीमार्पू असे अनुभवी आंतरराष्ट्रीय खेळाडू आहेत.
तुलनेत केरळ हॉकी संघाकडे अंडरडॉग म्हणून पाहिले जात आहे. प्रशिक्षक सागर सिंग ठाकूर यांनी यजमान संघाचा आत्मविश्वास उंचावलेला आहे, असे सांगतानाच आमच्याकडे एक चांगला संघ आहे आणि कुशल खेळाडू आहेत. शिवाय अनुभव ही जमेची बाजू ठरेल. मात्र, सामना संपेपर्यंत काहीही गृहीत धरले जाऊ शकत नाही.
भोपाळ येथे 12व्या आवृत्तीत यापूर्वी दोन्ही संघ आमनेसामने आले होते. त्यात हॉकी महाराष्ट्राने 7-1 असा मोठा विजय मिळवला आहे. 2022 मध्ये हॉकी महाराष्ट्रने दोन विजय नोंदवून त्यांच्या ड गटामध्ये अव्वल स्थान पटकावले. केरळनंतर त्यांनी हॉकी बिहारला त्याच फरकाने हरवले होते. 2022 स्पर्धेत हॉकी महाराष्ट्र चौथ्या स्थानावर राहिला. दोन आठवड्यांच्या सराव शिबिरासह महाराष्ट्र संघ मोठया तयारीनिशी राष्ट्रीय स्पर्धेत उतरत आहे. स्पर्धा ठिकाणी सर्व खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ उपस्थित आहे.
विद्यमान हॉकी महाराष्ट्र संघात सर्वाधिक खेळाडू हे सब-ज्युनियर स्तरापासून एकत्र खेळत आहेत. 2022 मध्ये (हॉकी मध्य प्रदेशविरुद्ध) अंतिम उपविजेतेपद ही हॉकी महाराष्ट्रची सर्वात मोठी कामगिरी होती यात शंका नाही. परंतु विजेतेपदावर दावा करण्यासाठी त्यांना अजून चांगली आणि सातत्याने प्रभावी कामगिरी करावी लागेल. त्यादृष्टीने सलामीचा सामना जिंकणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे स्पर्धेचा टोन सेट होईल, असे प्रशिक्षक सागर यांनी स्पष्ट केले. ते एफआयएच लेव्हल टू प्रशिक्षक आहेत. (Home Advantage: Hosts Maharashtra target a winning start)
महत्वाच्या बातम्या –
टी-20 विश्वचषकासाठी बीसीसीआयचा मोठा प्लॅन! विराटविषयी बातमी वाचून नाही बसणार विश्वास
युवा खेळाडूंसाठी प्रेरणा! रणजी फायनलसाठी सचिन-रोहितची वानखेडेत हजेरी, सोशल मीडियावर चर्चा