पुणे: फर्ग्युसन कॉलेज आणि नंदन बाळ टेनिस अकादमी यांच्या तर्फे आयोजित व एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या डी.ई.एस. फर्ग्युसन कॉलेज एमएसएलटीए चॅम्पियनशीप सिरीज 12वर्षांखालील टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत उप-उपांत्यपूर्व फेरीत मुलांच्या गटात नमिश हूड, नीरज जोर्वेकर यांनी तर, मुलींच्या गटात आदिती खानापुरी, सारा फेंगसे या खेळाडूंनी मानांकित खेळाडूंवर विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
फर्ग्युसन कॉलेज टेनिस कोर्ट या ठिकाणी सुरु असलेल्या या स्पर्धेत मुलांच्या गटात उप-उपांत्यपूर्व फेरीत नमिश हूड याने चौथ्या मानांकित आर्यन किर्तनेचा टायब्रेकमध्ये 7-5, 4-6, 7-6(2) असा पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदवला.नीरज जोर्वेकर याने सहाव्या मानांकित हुसेन सैफीचा 6-0, 6-1 असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली.
मुलींच्या गटात बिगरमानांकित सारा फेंगसे हिने तिसऱ्या मानांकित रित्सा कोंडकरचा 6-3, 6-2 असा सरळ सेटमध्ये पराभव करून सनसनाटी निकालाची नोंद केली. आदिती खानापुरीने आठव्या मानांकित अनुष्का जोगळेकरवर 3-6, 6-3, 7-6(5) असा तीन सेटमध्ये विजय मिळवला.सहाव्या मानांकित शिबानी गुप्तेने विपश्यना सोनावणेचा 6-0, 6-0 असा एकतर्फी पराभव केला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: उप-उपांत्यपूर्व फेरी:
स्मित उंद्रे[1] वि.वि.सर्वज्ञ सरोदे 6-0, 6-1;
अक्षत दक्षिणदास[7] वि.वि.पृथ्वीराज दुधाने 6-2, 6-3;
क्रिशय तावडे [3] वि.वि.कबीर गुंडेचा 6-0, 6-0;
नमिश हूड वि.वि.आर्यन किर्तने [4] 7-5, 4-6, 7-6(2);
अहान पाटील वि.वि.त्रिशिक वाकलकर 6-4, 6-3;
अथर्व डकरे वि.वि.मनवेंद्र त्रिवेदी 6-2, 6-2;
नीरज जोर्वेकर वि.वि.हुसेन सैफी[6] 6-0, 6-1;
वरद उंद्रे [2] वि.वि.युगंधर शास्त्री 6-3, 6-4;
मुली:
स्वरा जावळे [1] वि.वि.आयुश्री तरंगे 6-3, 6-0;
श्रावी देवरे[7] वि.वि.माया शेख 6-1, 6-0;
काव्या पांडे[4] वि.वि.आहाना पाटील 6-3, 6-2;
आदिती खानापुरी वि.वि.अनुष्का जोगळेकर [8] 3-6, 6-3, 7-6(5);
वीरा हरपुडे वि.वि.रितू ग्यान 6-3, 6-0;
सारा फेंगसे वि.वि.रित्सा कोंडकर [3] 6-3, 6-2;
शिबानी गुप्ते[6] वि.वि.विपश्यना सोनावणे 6-0, 6-0;
सृष्टी सूर्यवंशी[2] वि.वि.सान्वी राजू 6-0, 6-0;
महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘लोकांनी तूला संपल्यात जमा केले होते, पण तू…’, आयपीएल जिंकल्यानंतर हार्दिकचं भाऊ कृणालकडून कौतुक
ओहो! गुजरात आयपीएलचा चँपियन बनल्यानंतर ट्रॉफी घेऊन झोपले ‘नेहरा कुटुंबीय’, Photo चर्चेत