पुणे। फर्ग्युसन कॉलेज आणि नंदन बाळ टेनिस अकादमी यांच्या तर्फे आयोजित व एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या डी.ई.एस. फर्ग्युसन कॉलेज एमएसएलटीए चॅम्पियनशीप सिरीज 12वर्षांखालील टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीतमुलींच्या गटात स्वरा जावळे, काव्या पांडे, वीरा हरपुडे, सृष्टी सूर्यवंशी या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून आगेकुच केली.
फर्ग्युसन कॉलेज टेनिस कोर्ट या ठिकाणी सुरु असलेल्या या स्पर्धेत मुलांच्या गटात उपांत्यपूर्व फेरीत अव्वल मानांकित स्मित उंद्रेने सातव्या मानांकित अक्षत दक्षिणदासचा 6-3, 6-3 असा तर, तिसऱ्या मानांकित क्रिशय तावडेने अहान पाटीलचा 6-4, 6-1 असा पराभव केला. नमिश हूड याने अथर्व डकरेवर 6-4, 6-2 असा विजय मिळवला.
मुलींच्या गटात अव्वल मानांकित स्वरा जावळेने आपली विजयी मालिका कायम ठेवत सातव्या मानांकित श्रावी देवरेचा 6-2, 6-0 असा सहज पराभव केला. चौथ्या मानांकित काव्या पांडेने काल मानांकित खेळाडूवर विजय मिळवणाऱ्या आदिती खानापुरीचा 3-6, 6-2, 7-5 असा तीन सेटमध्ये पराभव केला. वीरा हरपुडेने सारा फेंगसेचा 4-6, 6-4, 6-1 असा तर, दुसऱ्या मानांकित सृष्टी सूर्यवंशीने सहाव्या मानांकित शिबानी गुप्तेचा 6-4, 6-4 असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: उपांत्यपूर्व फेरी:
स्मित उंद्रे[1] वि.वि.अक्षत दक्षिणदास[7]6-3, 6-3;
क्रिशय तावडे [3] वि.वि.अहान पाटील 6-4, 6-1;
नमिश हूड वि.वि.अथर्व डकरे 6-4, 6-2;
वरद उंद्रे [2] वि.वि.नीरज जोर्वेकर 6-2, 6-4;
मुली:
स्वरा जावळे [1] वि.वि.श्रावी देवरे[7] 6-2, 6-0;
काव्या पांडे[4] वि.वि.आदिती खानापुरी 3-6, 6-2, 7-5;
वीरा हरपुडे वि.वि.सारा फेंगसे 4-6, 6-4, 6-1;
सृष्टी सूर्यवंशी[2] वि.वि.शिबानी गुप्ते[6] 6-4, 6-4;
दुहेरी: मुले: दुसरी फेरी:
स्मित उंद्रे/वरद उंद्रे[1] वि.वि.सर्वज्ञ सरोदे/अथर्व डकरे 6-2, 6-2;
हुसेन सैफी/अक्षत दक्षिणदास[3] वि.वि.आहान पाटील/पुरंजय कुतवळ 6-1, 6-3;
तनिश पाटील/अझलन शेख वि.वि.वीर चतुर/कबीर गुंडेचा[4] 7-5, 7-5;
प्रजीत रेड्डी/सुजय देशमुख वि.वि.प्रत्यूश काळे/अभीर सिंग सिद्धू 6-2, 6-2.
महत्त्वाच्या बातम्या –
क्रिकेटविश्वातील ‘फिनीक्स’ आहे तो!
‘तो’ म्हणाला होता, ‘माझा मृत्यू विमान अपघातात होईल आणि मी स्वर्गात जाईल’; २ वर्षांनी बरोबर तसेच घडले
दीपक चाहर चढला बोहल्यावर, लाईव्ह सामन्यात मागणी घातलेल्या प्रेयसीबरोबर थाटला संसार, Photo व्हायरल