भारतीय संघाचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा आयपीएल २०२२ सुरू होण्याच्या दोन दिवस आधी त्याचा संघ चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार बनला होता. एमएस धोनीने ही जबाबदारी सोडल्यानंतर फ्रँचायझीने जडेजाला ही जबाबदारी सोपवली होती. परंतु शनिवारी (३० एप्रिल) अचानक जडेजाने कर्णधारपदावरून माघार घेतली आणि संघाचे नेतृत्व पुन्हा धोनीच्या हातात आले. आता भारतीय संघाचे माजी कर्णधार मोहम्मद अजरुद्दीन यांनी या संपूर्ण प्रकाराव मत व्यक्त केले आहे.
रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) कर्णधारपदावरून पायउतार झाल्यानंतर त्याच्यावर या जबाबदारीमुळे दबाव येत असल्याचे सांगितले गेले. सीएसकेने माहिती दिल्याप्रमाणे कर्णधारपदाच्या दबावामुळेच जडेजाला त्याचा अपेक्षेप्रमाणे प्रदर्शन करता आले नाहीये. अशात आता एमएस धोनी (MS Dhoni) पुन्हा एकदा सीएसकेचा कर्णधार बनला आहे. सनरायझर्स हैदराबादविरुद्ध रविवारी (१ मे) खेळल्या जाणाऱ्या सामन्यात धोनी पुन्ही संघाची सूत्रे हातात घेईल.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
आयपीएल २०२२ मध्ये सीएसकेच्या कर्णधारपदाविषयी हा जो काही प्रकार घडला, त्यावर मोहम्मद अजहरुद्दीन (Mohammad Azharuddin) व्यक्त झाले आहेत. माजी भारतीय कर्णधार म्हणाले, “मला माहिती नाही की, अखेर चेन्नईने रवींद्र जडेजाला कर्णधार बनवलेच कशासाठी होते. प्रामाणिकपणे सांगायचे झाले तर, यानंतर जडेजाचा खेळ पूर्णपणे विस्कळीत झाला होता. तो एक अप्रतिम क्षेत्ररक्षक आहे, पण या सामन्यांदरम्यान त्याने काही खूप महत्वाचे आणि सोपे झेल सोडले आहेत. जर एमएस धोनी प्लेइंग इलेव्हनमध्ये आहे, तर त्यानेच संघाचा कर्णधार असले पाहिजे.”
दरम्यान, एमएस धोनीने भारतीय संघाचे अनेक वर्ष नेतृत्व केले आहे आणि त्याच्या नेतृत्वात संघाला टी-२० विश्वचषक आणि एकदिवसीय विश्वचषक जिंकता आला आहे. तो भारताच्या महान कर्णधारांपैकी एक आहे. आयपीएलमध्येही त्याची कामगिरी काही साधारण नाहीये. त्याने एकूण २०४ सामन्यांमध्ये सीएसकेसाठी कर्णधारपद भूषवले आहे. यापैकी १२१ सामन्यात त्याने संघाला विजय मिळवून दिला आहे, तर ८२ सामन्यात पराभव पत्करला आहे. सीएसकेने त्याच्या नेतृत्वात आयपीएलचे ९ अंतिम सामने खेळले आणि त्यापैकी ४ वेळा संघ चॅम्पियन ठरला आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ताशी १५०हून अधिकच्या गतीने चेंडू फेकणाऱ्या उमरान मलिकवर गांगुलीही फिदा; वाचा काय म्हणाला ‘दादा?’
पहिल्याच सामन्यात सॅमसनची विकेट घेणारा मुंबई इंडियन्सचा नवा भिडू आहे तरी कोण? जाणून घ्या एका क्लिकवर