---Advertisement---

एमएसएलटीए-डेक्कन जिमखाना महाटेनिस एआयटीए राष्ट्रीय मानांकन अजिंक्यपद स्पर्धा कियान पौआ, नमन शहा यांचे विजय

On: रविवार, मे 1, 2022 5:26 PM
Kiaan-Paua
---Advertisement---

पुणे। डेक्कन जिमखाना व महाटेनिस यांच्या तर्फे आयोजित व एमएसएलटीए आणि एआयटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या एमएसएलटीए-डेक्कन जिमखाना महाटेनिस 12 वर्षांखालील राष्ट्रीय मानांकन टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत पहिल्या पात्रता फेरीत मुलांच्या गटात कियान पौआ, नमन शहा, आर्यन येमूल यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून पात्रता फेरीच्या दुसऱ्या चरणात प्रवेश केला.

डेक्कन जिमखाना टेनिस कोर्ट येथे आजपासून सुरु झालेल्या या स्पर्धेत मुलांच्या गटात वेद परदेशीने सुमेर मेढीचा टायब्रेकमध्ये 9-8(5) असा संघर्षपूर्ण पराभव केला. कियान पौआ याने पंधराव्या मानांकित तनिश पाटीलचा 9-6 असा पराभव करून आगेकूच केली. अर्णव पांडेने विवान मल्होत्राचा 9-7 असा पराभव केला. चुरशीच्या लढतीत आर्यन येमूलने अथर्व बगाडेवर टायब्रेकमध्ये 9-8(2) असा विजय मिळवला.

निकाल: पहिली पात्रता फेरी: मुले:
अर्णव पांडे वि.वि.विवान मल्होत्रा 9-7;
आर्यन येमूल वि.वि.अथर्व बगाडे 9-8(2);
श्लोक गाबा वि.वि.आर्यन बॅनर्जी 9-2;
आहान पाटील[11]वि.वि.आरव गार्गा 9-1;
देवीत गोसावी वि.वि.विहार सोनावणे 9-5;
कियान पटेल[9] वि.वि.रुद्र मेमाणे 9-4;
नमन शहा वि.वि.इंद्रनील जोशी 9-7;
वेद परदेशी वि.वि.सुमेर मेढी 9-8(5);
कियान पौआ वि.वि.तनिश पाटील[15] 9-6;

महत्त्वाच्या बातम्या – 

एसपी गोसावी मेमोरियल पुणे आंतरक्लब टेनिस अजिंक्यपद: पीवायसी 1, पीवायसी 2 संघांचा उपांत्य फेरीत प्रवेश

६९ व्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत महिला गटातील होतकरु मित्र मंडळाने अमर हिंदचा पराभव करत दुसरा दिवस गाजवला

जय शंकर क्रीडा मंडळ महिला व पुरुष गट जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा: होतकरू, जय बजरंग, जय खंडोबा यांना जेतेपद

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---