कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रभावामुळे आयपीएल 2021 स्पर्धा रद्द करण्यात आली आहे. बीसीसीआयने खेळाडूंना कोरोनाचा संसर्ग होत असल्यामुळे हा मोठा निर्णय घेतला आहे. आयपीएल रद्द केल्याने बीसीसीआयला कोट्यावधी रुपयांचा फटका बसला आहे, तसेच आयपीएल संघाचे देखील मोठे नुकसान झाले आहे. केवळ बीसीसीआयच नाही तर आयपीएल संघ देखील आयपीएलद्वारे मोठ्या प्रमाणात पैसे कमवत असतात. आपण या लेखात बघणार आहोत अशा 5 बाबी ज्याद्वारे आयपीएल संघ कमाई करत असतात.
1) संघाच्या जर्सीच्या पुढच्या बाजूने कमाई –
आयपीएल संघांची सर्वाधिक कमाई संघाच्या जर्सीवर छापलेल्या जाहिरातीतून होते. उदाहरणार्थ, सॅमसंग हे मुंबई इंडियन्सच्या जर्सीच्या अग्रभागी लिहिले आहे. एका अंदाजानुसार आयपीएल संघ पुढच्या बाजूवर लावलेल्या लोगोमधून तब्बल 15 ते 20 कोटी रुपयांच्या दरम्यान कमाई करतात.
2) हेल्मेटवरील जाहिरातींमधून कमाई
जर्सीच्या फ्रंट लोगोनंतर खेळाडूंच्या हेल्मेटच्या अग्रभागी असलेल्या जाहिरातींवरून आयपीएल संघ सर्वाधिक कमाई करतात. यातून संघाचे मालक सुमारे 2 ते 14 कोटी रुपये कमवतात.
3)टीम जर्सीच्या मागील बाजूवरील कमाई
सघांच्या जर्सीच्या मागच्या बाजूला असलेल्या जाहिरातींमधूनही कमाई केली जाते. उदाहरणार्थ, आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्जच्या खेळाडूंच्या जर्सीच्या मागील बाजूस इंडिया सिमेंट लिहिलेले आहे. जर्सीवर मागील बाजूस छापलेल्या जाहिरातीतून आयपीएल संघ 7 ते 13 कोटी रूपयांपर्यंत कमाई करतात.
4 ) जर्सीच्या खांद्यावरील जाहिरातीतून कमाई –
खेळाडूंच्या जर्सीवर खांद्याच्या भागात देखील काही कंपनीचे लोगो असतात. उदाहरणार्थ जियोचा लोगो आरसीबीच्या जर्सीवर छापलेला आहे. आयपीएलमधील संघ खांद्यावरील जाहिरातींमधून दिड ते तीन कोटी रुपयांची कमाई करतात.
महत्त्वाच्या बातम्या –
कोरोना काळात सुरेश रैनाच्या नातेवाईकांच्या मदतीला धावून आला सोनू सूद; केली ‘ही’ मोठी मदत
शिखर धवनने घेतली कोरोनाची लस; फोटो शेअर करत म्हणाला…