---Advertisement---

सचिनच्या कसोटी रेकॉर्डवर जो रूटचा डोळा! किती लागेल वेळ? जाणून घ्या संपूर्ण गणित

On: शनिवार, जुलै 26, 2025 10:00 AM
---Advertisement---

इंग्लंडचा स्टार फलंदाज जो रूट सध्या कसोटी क्रिकेटमध्ये विक्रमी कामगिरी करत आहे. 34 वर्षीय रूटने आतापर्यंत 157 कसोटी सामन्यांत 286 डावांत 51.17 च्या सरासरीने 13,409 धावा केल्या असून, त्याच्या खात्यात 38 शतकं आणि 66 अर्धशतकं जमा आहेत. विशेष म्हणजे, 2020 पासून त्याने 68 कसोटीत 55.00 च्या सरासरीने तब्बल 6,050 धावा केल्या असून, यामध्ये 21 शतकांचा समावेश आहे. 2021 मध्ये एकट्या रूटने 1,708 धावा करत 6 शतकं झळकावली होती, तर 2024 मध्येही त्याची कामगिरी तितकीच जबरदस्त राहिली आहे.

सध्या जो रूट फक्त 2,513 धावांनी भारताच्या महान फलंदाज सचिन तेंडुलकरच्या कसोटी क्रिकेटमधील सर्वाधिक 15,921 धावांच्या जागतिक विक्रमापासून दूर आहे. त्याचा सध्याचा फॉर्म आणि फिटनेस पाहता, पुढील तीन वर्षांत हा विक्रम मोडण्याची शक्यता प्रबळ मानली जात आहे. रूटने 2012 मध्ये भारताविरुद्ध नागपूरमध्ये कसोटी पदार्पण केलं होतं. त्यावेळी कुणालाही वाटलं नसेल की हा तरुण फलंदाज भविष्यात सचिनच्या विक्रमाच्या इतक्या जवळ जाईल.

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा

सचिन तेंडुलकर (भारत) – 15,921
जो रूट (इंग्लंड) – 13,409
रिकी पाँटिंग (ऑस्ट्रेलिया) – 13,378
जॅक कैलिस (द. आफ्रिका) – 13,289
राहुल द्रविड (भारत) – 13,288

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत सचिन तेंडुलकर आघाडीवर असून, त्यानंतर रूट, रिकी पाँटिंग, जॅक कॅलिस आणि राहुल द्रविड यांचा क्रमांक लागतो. त्याचप्रमाणे शतकांच्या यादीतही सचिन (51 शतकं) अव्वल आहे, पण रूट आता 38 शतकांसह पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. एकूणच जो रूटची सातत्यपूर्ण कामगिरी पाहता क्रिकेटप्रेमी आता नव्या इतिहासाच्या साक्षीदार होण्यासाठी उत्सुक आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---