पॅरिस ऑलिम्पिक 2024 सुरू होण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. जगातील या सर्वात प्रतिष्ठित स्पर्धेत भाग घेण्यासाठी भारत आतापर्यंतचा आपला सर्वात मोठा संघ पाठवणार आहे. यंदाच्या भारतीय संघात 117 खेळाडूंचा समावेश असेल. ही स्पर्धा पॅरिसमध्ये 26 जुलै ते 11 ऑगस्ट दरम्यान आयोजित होणार आहे.
भारतानं आतापर्यंत ऑलिम्पिकमध्ये एकूण 35 पदके जिंकली आहेत. यामध्ये 10 सुवर्ण, 9 रौप्य आणि 16 कांस्य पदकांचा समावेश आहे. 2020 टोकियो ऑलिम्पिक भारतासाठी सर्वात यशस्वी राहिलं होतं, ज्यामध्ये देशानं 1 सुवर्ण, 2 रौप्य आणि 4 कांस्य पदकांसह एकूण 7 पदकं जिंकली होती. यावेळी भारतीय संघाकडून यापेक्षा जास्त पदकांची अपेक्षा असेल.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणारे सर्वाधिक खेळाडू हरियाणातील आहे. या राज्यातील एकूण 24 खेळाडू पॅरिसमध्ये देशाचं प्रतिनिधित्व करतील. त्यापाठोपाठ पंजाबचा क्रमांक लागतो, जिथले एकूण 19 खेळाडू पॅरिसमध्ये खेळताना दिसतील. दक्षिणेतील तामिळनाडू 13 खेळाडूंसह तिसऱ्या स्थानावर आहे. याशिवाय कर्नाटक आणि उत्तर प्रदेशातील 7-7 तर केरळमधील 6 खेळाडू पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भाग घेत आहेत.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या महाराष्ट्राच्या खेळाडूंबद्दल बोलायचं झालं तर, राज्यातील एकूण 5 खेळाडू या गेम्समध्ये आपला जलवा दाखवणार आहेत. तिरंदाजीत प्रवीण जाधव भारतीय संघाचं प्रतिनिधित्व करणार आहे. तर अविनाश साबळे आणि सर्वेश कुशारे हे दोघं ॲथलेटिक्समध्ये प्रतिनिधित्व करणार आहेत.
राष्ट्रीय विक्रम धारक अविनाश साबळेकडून 3000 मीटर स्टीपलचेजमध्ये पदकाची अपेक्षा आहे. तर सर्वेश कुशारे उंच उडीत दावा ठोकणार आहे. चिराग शेट्टी याच्याकडून देखील बॅडमिंटनमध्ये पदकाची अपेक्षा असेल. तो सत्विकसाईराज सोबत पुरुष दुहेरीत खेळणार आहे. तर स्वप्निल कुसळे पुरुषांच्या 50 मीटर रायफल शूटिंगमध्ये भाग घेणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
रोहितचं नाव होणार अजरामर, शतकांच्या विक्रमापासून केवळ दोन पावलं दूर ‘हिटमॅन’!
व्हीव्हीएस लक्ष्मणला आयपीएलमध्ये मिळू शकते मोठी जबाबदारी, या संघाकडून मिळणार ऑफर!
शेवटच्या सामन्यात शतक…तरीही संजू सॅमसनला संघातून का वगळलं?