---Advertisement---

डीएसपी मोहम्मद सिराजला तेलंगणा सरकारकडून किती पगार मिळतो? पदवी नसूनही नियुक्ती कशी झाली?

On: सोमवार, डिसेंबर 9, 2024 3:50 PM
---Advertisement---

भारतानं जेव्हा 2024 टी20 विश्वचषक जिंकला, त्यानंतर तेलंगणा सरकारनं मोहम्मद सिराजला सरकारी नोकरी देण्याचं आश्वासन दिलं होतं. सरकारनं यावर्षी जुलैमध्ये हे आश्वासन पूर्ण केलं आणि सिराजची पोलीस दलात डीएसपी पदावर नियुक्ती केली. सिराज डीएसपी झाला हे सर्वांनाच माहित आहे, मात्र डीएसपी म्हणून त्याचा पगार किती आहे हे तुम्हाला माहिती आहे का? नसेल माहित तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे.

डीएसपी झाल्यानंतर मोहम्मद सिराजची वेतन श्रेणी 58,850 ते 1,37,500 रुपयांच्या घरात आहे. पगारासोबतच त्याला वैद्यकीय, प्रवास आणि घरभाडं यासाठी वेगळे भत्ते मिळतात. डीएसपी पदावर नियुक्ती होण्यासाठी पदवीधर असणं आवश्यक आहे. मात्र सिराजनं केवळ 12वीपर्यंतच शिक्षण घेतलं आहे. या संदर्भात तेलंगणा सरकारनं एक निवेदन जारी करून स्पष्ट केलंय की सिराजला या नियमातून सूट मिळाली आहे.

मोहम्मद सिराजच्या एकूण कमाईबद्दल बोलायचं झाल्यास, तो डीएसपी पदावर असण्यासोबतच बीसीसीआयचा करारबद्ध खेळाडू आहे. 2024 च्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट लिस्टनुसार सिराजचा ‘अ’ श्रेणीत समावेश करण्यात आला आहे. या श्रेणीतील खेळाडूंना वार्षिक 5 कोटी रुपये मानधन मिळतं. आयपीएल 2025 च्या मेगा लिलावात गुजरात टायटन्सनं सिराजला 12.25 कोटी रुपयांना विकत घेतलं होतं. याशिवाय हा भारतीय गोलंदाज जाहिरातींमधूनही भरपूर कमाई करतो.

मोहम्मद सिराजपूर्वी भारताचा माजी वेगवान गोलंदाज जोगिंदर शर्मा डीएसपी पदावर कार्यरत होता. याशिवाय भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरही पंजाबमध्ये डीएसपी राहिली आहे. 2022 राष्ट्रकुल क्रीडा आणि 2023 आशियाई खेळांमध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाच्या उत्कृष्ट कामगिरीनंतर दीप्ती शर्माला यूपी पोलिसात डीएसपी पद मिळालं होतं.

हेही वाचा – 

टीम इंडियासाठी पुढील 24 तास अत्यंत महत्त्वाचे, जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण
भारताचा हा अष्टपैलू खेळाडू लवकरच ‘डॉक्टर’ बनणार! लिलावात मिळाली होती मोठी रक्कम
बॉर्डर-गावस्कर मालिकेत भारत कमबॅक कसा करू शकतो? हे 4 बदल करणे आवश्यक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---