दुलिप ट्रॉफी 2024 ने (duleep trophy 2024) भारतीय क्रिकेटच्या देशांतर्गत हंगामाची सुरुवात झाली. यावेळी ही स्पर्धा देखील खास आहे. कारण टीम इंडियाचे (Team India) काही मोठे खेळाडू सध्या या स्पर्धेत चार संघांकडून खेळत आहेत. या स्पर्धेत खेळाडू चांगली कामगिरी करून भारतीय संघात स्थान मिळवण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे निवडकर्त्यांना नवीन प्रतिभा शोधण्यातही मदत होईल.
इतकेच नाही तर बीसीसीआयने नुकत्याच नव्याने तयार केलेल्या देशांतर्गत वेतन रचनेमुळे खेळाडूंनाही मोठा फायदा होणार आहे. दुलिप ट्रॉफी स्पर्धेतील खेळाडूंचे वेतन (Duleep Trophy Salary) नेमके किती असेल?, हे माहीत नसले तरी 2023 पासून स्पर्धेसाठी बक्षीस रक्कम वाढवण्यात आली आहे. यापूर्वी बक्षिसाची रक्कम 50 लाख होती, परंतु सध्याच्या संरचनेत विजेत्याला 4 कोटी रुपये आणि उपविजेत्याला 50 लाख रुपये मिळतील.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने देशांतर्गत हंगामात खेळणाऱ्या खेळाडूंच्या वेतन रचनेत नुकतेच बदल केले आहेत. या बदलानुसार, सध्या 41 किंवा त्याहून अधिक रणजी ट्रॉफी सामने खेळलेल्या खेळाडूंना प्रति सामन्याच्या दिवशी 60,000 रुपये मिळतात. तर 21 ते 40 सामने खेळणाऱ्या खेळाडूंना प्रति सामन्याच्या दिवशी 50,000 रुपये आणि 20 किंवा त्यापेक्षा कमी सामने खेळणाऱ्या खेळाडूंना प्रति सामन्याच्या दिवशी 40,000 रुपये मिळतात.
दुलिप ट्रॉफी 2024 च्या पहिल्या फेरीच्या सामन्यांच्या निकालाविषयी बोलायचं झाल्यास, इंडिया ए संघाला इंडिया बी संघाने 76 धावांनी पराभूत केले. इंडिया ए संघात शुबमन गिल व केएल राहुल यांचा समावेश होता. तर, इंडिया बी संघात रिषभ पंत व यशस्वी जयस्वाल हे भारतीय संघातील महत्त्वाचे सदस्य खेळत होते. तिसऱ्या दिवशी संपलेल्या इंडिया सी विरुद्ध इंडिया डी सामन्यात, ऋतुराज गायकवाड याच्या नेतृत्वातील इंडिया सी संघाने शानदार विजय मिळवला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
कोण आहे हा 4 फुट उंचीचा पॅरा ॲथलीट, ज्यानं देशासाठी सुवर्णपदक जिंकलं?
24 वर्ष…एकही पराभव नाही! बांगलादेशविरुद्ध कसोटीमध्ये भारताचा तुफानी रेकॉर्ड; आकडेवारी खूपच धक्कादायक
दुलीप ट्रॉफीमध्ये आरसीबीच्या गोलंदाजाचा कहर, पहिल्याच सामन्यात घेतल्या 9 विकेट