भारतीय संघ मागील एक दशकापासून आयसीसी ट्रॉफी जिंकण्यात अपयशी ठरताना दिसत आहे. भारताने 2013मध्ये एमएस धोनी याच्या नेतृत्वाखाली अखेरची आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. यानंतर भारतीय संघ अनेकदा आयसीसी स्पर्धांच्या उपांत्य आणि अंतिम सामन्यात पोहोचला आहे, परंतु आयसीसी ट्रॉफी जिंकण्यात भारतीय संघाला अपयशच येत आहे.
नुकतेच रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना गमावला होता. खरं तर, भारतीय संघाच्या खराब प्रदर्शन आणि ट्रॉफी न जिंकण्यामागे आयपीएल (IPL) स्पर्धेला जबाबदार मानले जात आहे. अशात वेस्ट इंडिजचे माजी कर्णधार क्लाईव्ह लॉयड यांनी आयपीएलचे समर्थन करत मोठे विधान केले आहे.
आयसीसी ट्रॉफी जिंकण्यात का अपयशी ठरतोय भारतीय संघ?
खरं तर, सन 2013 चॅम्पियन्स ट्रॉफी (2013 Champions Trophy) जिंकल्यानंतर भारतीय संघ एकूण 4 वेळा आयसीसी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात पोहोचला आहे. त्यात सन 2013 टी20 विश्वचषक, सन 2017 चॅम्पियन्स ट्रॉफी आणि दोन वेळा जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना यांचा समावेश आहे. मात्र, असे असूनही भारतीय संघाच्या हाती ट्रॉफी लागत नाहीये. 10 वर्षांपासून भारतीय संघाच्या या निराशाजनक प्रदर्शनानंतर आयपीएलवर जोरदार टीका केली जात आहे.
अशातच वेस्ट इंडिजचे माजी कर्णधार क्लाईव्ह लॉयड (Clive Lloyd) यांनी विधान करत म्हटले की, “भारताचे भविष्य चांगले असू शकतो आणि हे फक्त आयपीएलमुळे.” त्यांनी पुढे म्हटले की, “तुम्ही उपांत्य सामन्यात पोहोचत आहात आणि अंतिम सामन्यातही प्रवेश करत आहात. तुम्ही अनेकदा अंतिम सामन्यासाठी क्वालिफाय केले आहे. मला वाटते की, भारताचे भविष्य खूप चांगले होत आहे. याचे कारण आयपीएल आहे. तुमच्याकडे एक शानदार कसोटी संघ आहे आणि फक्त त्या क्षणाची वाट पाहा, जेव्हा तुम्ही मोठ्या स्पर्धा जिंकाल. गोष्टी सायकलप्रमाणे चालतात आणि मला आशा आहे की, भविष्यात हे नक्की काम करेल.”
खरं तर, भारतीय संघ 12 जुलैपासून वेस्ट इंडिजविरुद्ध 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळेल. ही मालिका 2023-25 आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा भाग असेल. पहिला कसोटी सामना 12 ते 16 जुलैदरम्यान विंडसर पार्क, डॉमिनिका येथे खेळला जाईल. तसेच, दुसरा कसोटी सामना 20-24 जुलैपर्यंत क्वीन्स पार्क ओव्हल, त्रिनिदाद येथे खेळला जाईल. त्यानंतर वेस्ट इंडिज विरुद्ध भारत संघात 3 वनडे आणि 5 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांची मालिका खेळली जाईल. (how will team india end the title drought of 10 years west indies former captain told the unique formula)
महत्वाच्या बातम्या-
सरफराजने केला होता चेतन शर्मांचा अपमान? आक्रमक सेलिब्रेशनबाबत धक्कादायक खुलासा, लगेच वाचा
लॉर्ड्स कसोटीपूर्वी कांगारुच्या दोन धुरंधरांना पाँटिंगचा मोलाचा सल्ला, वाचा काय म्हणाला माजी कर्णधार