भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) संघ निवडकर्ते जतिन परांजपे, देवांग गांधी आणि शरणदीप सिंग यांचा कार्यकाळ सप्टेंबरमध्ये संपला होता. त्यामुळे रिक्त जागेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 नोव्हेंबर होती. या दिवशी संध्याकाळी 6 वाजेपर्यंतच अर्ज करायला परवानगी होती.
माजी भारतीय क्रिकेटपटू अजित आगरकर, चेतन शर्मा, मनिंदर सिंग शिवसुंदर दास आणि अभय कुरुविला यांनी राष्ट्रीय निवड समितीत तीन रिक्त पदांसाठी अर्ज केला आहे. यातून आगरकर आणि चेतन शर्मा यांची निवड झाल्यास राष्ट्रीय निवड समितीला नवा अध्यक्ष मिळू शकेल.
आंतरराष्ट्रीय अनुभव नसतानाही पश्चिम बंगालचे रणदेव बोस यांनीही या पदासाठी अर्ज केला होता. त्यानी 91 प्रथम श्रेणी सामन्यांत 317 बळी घेतले आहेत. किमान 30 प्रथम श्रेणी सामने खेळल्यामुळे ते या पदासाठी पात्र ठरले. ते बंगालचे गोलंदाजी प्रशिक्षक होते.
माजी भारतीय फिरकीपटू सुनील जोशी सध्या निवड समितीचे प्रमुख आहेत. परांजपे, देवांग गांधी आणि सरनदीप सिंग या क्रिकेटपटूंपेक्षा जोशी वरिष्ठ आहेत त्यामुळे त्यांची निवड समितीचे प्रमुख म्हणून निवड करण्यात आली.
यावर्षी मार्च महिन्यात निवड समितीत माजी वेगवान गोलंदाज हरविंदर जोशी निवड झालेले दुसरे सदस्य होते. माजी मुख्य निवडकर्ता एमएसके प्रसाद आणि गगन खोडा यांची मुदत फेब्रुवारीमध्ये संपल्यानंतर जोशी आणि हरविंदर यांची या पदावर नेमणूक झाली होती.
बीसीसीआयच्या नियमांनुसार, सर्वात जास्त कसोटी सामने खेळणार्या क्रिकेटपटूला समितीचे अध्यक्ष केले जाते. यामुळे बीसीसीआयने मनिंदर किंवा आगरकर या दोघांची नेमणूक केल्यास ते जोशींच्या जागी नवीन निवड प्रमुख होऊ शकतात, असा निष्कर्ष काढला जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
डेव्हिड वॉर्नरच्या पत्नीने उघडले रहस्य; म्हणाली त्याला हवे ते तो करू शकतो
भारताविरुद्धच्या कसोटीत ‘हा’ खेळाडू वॉर्नरसह येणार सलामीला? ऑस्ट्रेलियन कर्णधाराने सोडलं मौन
ट्रेंडिंग लेख
आठवणीतील १९८७ विश्वचषक : मार्टिन क्रो यांच्या ‘त्या’ झेलाने सामन्याचा नूर पालटला
धन्यवाद आणि गुडबाय! सचिन बोलत होता अन् वानखेडेवर चाहते रडत होते…