आशिया खंडाबाहेर केवळ ४ भारतीय यष्टीरक्षकांना कसोटीत शतकी खेळी करता आल्या आहेत. यष्टीरक्षक म्हणून आशिया खंडाबाहेर सर्वाधिक सामने खेळणाऱ्या धोनीला मात्र असा विक्रम कधीही करता आला नाही.
अगदी २२ वर्षीय रिषभ पंतने आशिया खंडाबाहेर कसोटीत दोन शतकी खेळी केल्या आहेत. ७सप्टेंबप २०१८ रोजी त्याने द ओव्हल येथे ११४ धावांची शतकी खेळी केली होती. तर ३ जानेवारी २०१९ रोजी सिडनी कसोटीत त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध नाबाद १५९ धावांची खेळी केली होती.
भारतीय खेळाडूंमध्ये आशिया खंडाबाहेर दोन शतकी खेळी करणारा तो एकमेव भारतीय यष्टीरक्षक आहे. तर केवळ ४ भारती यष्टीरक्षकांनी परदेशात ५ शतकी खेळी केल्या आहेत.
धोनीने ३९ कसोटी सामन्यात आशिया खंडाबाहेर यष्टीरक्षक म्हणून २९.७९च्या सरासरीने १९९६ धावा केल्या. त्याची सर्वोच्च धावसंख्या ९२ राहिली.
पंतपुर्वी विजय मांजरेकर, अजय रात्रा आणि वृद्धिमान सहा या भारतीय यष्टीरक्षक फलंदाजांनी आशिया खंडाबाहेर प्रत्येकी एक शतक केले आहे. विशेष म्हणेज या तिघांनीही विंडीज विरुद्धच ही कसोटी शतके केली आहेत.
त्यामुळे पंत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये शतक करणारा पहिला भारतीय यष्टीरक्षक आहे. विशेष म्हणजे पंत कारकिर्दीत केवळ १३ कसोटी सामने खेळला आहे व त्याची दोनही शतके परदेशातील आहेत.
वनडेतही आशिया खंडाबाहेर यष्टीरक्षकांची कामगिरी सुमारच
वनडेत आशिया खंडाबाहेर केवळ राहुल द्रविड व केएल राहुल यांनाच यष्टीरक्षक म्हणून शतकी खेळी करता आली आहे. १३९ वनडे आशिया खंडाबाहेर खेळणाऱ्या धोनीने ९५ धावांची सर्वोच्च खेळी आशिया खंडाबाहेर केली आहे.
टी२० क्रिकेटमध्ये मात्र कोणत्याही भारतीय यष्टीरक्षकाला असा कारनामा करता आलेला नाही.
कसोटीमध्ये आशिया खंडाबाहेर शतके करणारे भारतीय यष्टीरक्षक –
118 – विजय मांजरेकर (विरुद्ध विंडीज, 1959)
115* – अजय रात्रा (विरुद्ध विंडीज, 2002)
104 – वृद्धिमान सहा (विरुद्ध विंडीज, 2016)
114 – रिषभ पंत (विरुद्ध इंग्लंड, 2018)
159* – रिषभ पंत (विरुद्ध ऑस्ट्रेलिया, 2019)
ट्रेडिंग घडामोडी-
-आयपीएल इतिहासात प्रत्येक हंगामात सर्वात महागडा ठरलेला भारतीय खेळाडू